राम मगदूम
गडहिंग्लज- ग्रामपंचायत सदस्याला कोण विचारतो ? असं एरव्ही बोलले जाते. परंतु, याच ग्रामपंचायत सदस्यांमधून विधानसभेचे सभापती, मंत्री, आमदार, जि. प. उपाध्यक्ष, जिल्हा बँकेचे अध्यक्ष-उपाध्यक्ष, पंचायत समितीचा सभापती-उपसभापती होण्याची संधी गडहिंग्लज तालुक्यातील नेत्यांना मिळाली. त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप तालुक्यात, जिल्ह्यातच नव्हे तर राज्याच्या राजकारणातही पाडली.गडहिंग्लज पंचायत समितीचे पहिले सभापती शिवगोंडराव पाटील हे महागावचे सरपंच होते. त्यांचे चिरंजीव ग्रामपंचायत सदस्य विजयराव पाटील, औरनाळचे सरपंच सतीश पाटील, कडलगेचे सरपंच बाबासाहेब पाटील, औरनाळचे सरपंच आप्पासाहेब पाटील, हरळी बुद्रूकचे सरपंच हिंदूराव नौकुडकर, बटकणंगलेचे सरपंच दीपक जाधव, हसूरचंपूच्या सरपंच जयश्री तेली, नूलचे ग्रामपंचायत सदस्य इकबाल काझी यांना सभापतीपदाचा बहुमान मिळाला.कडगावचे सरपंच नागाप्पाण्णा बटकडली यांना ५ वेळा जिल्हा परिषद सदस्य व उपसभापतीपदाचा बहुमान मिळाला. शिप्पूरचे सरपंच आनंदा मटकर, तेरणीचे सरपंच अरूण देसाई, भडगावच्या सरपंच श्रीया कोणकेरी, दयानंद पट्टणकुडी, हनिमनाळचे तानाजी कांबळेंना उपसभापतीपदाची संधी मिळाली.महागावचे सरपंच अप्पी पाटील यांना उपसभापती, जिल्हा परिषद सदस्य, गडहिंग्लज कारखान्याचे संचालक व जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. हणमंतराव पाटील यांना जि. प. सदस्य व कारखान्याच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली. औरनाळचे सरपंच मलगोंडा पाटील व बसर्गेचे सरपंच चंद्रशेखर पाटील हे जि.प. सदस्य झाले.भडगावचे सरपंच शिवाजी पाटील यांनी जि. प. सदस्य, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तर रामाप्पा करिगार यांना जि. प. उपाध्यक्ष, कारखाना संचालक व राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. नेसरीचे सरपंच महादेव साखरे यांना वीरशैव बँकेचे अध्यक्षपद मिळाले. हेमंत कोलेकर यांना जि. प. सदस्य, कारखाना संचालक व भाजपा तालुकाध्यक्षपद तर जोतिबा भिकले यांना उपसभापतीपद मिळाले.दुंडगेचे सरपंच बाबूराव मदकरींना गडहिंग्लज कारखान्याचे संचालक, बाजार समितीच्या सभापतीपदाची तर उदयकुमार देसाई यांना जनता बझारचे उपाध्यक्षपद, तम्माण्णा पाटील यांना तालुका संघाचे अध्यक्षपद मिळाले. मुगळीचे सरपंच सोमगोंडा आरबोळे यांना संकेश्वर कारखान्याचे संचालक तर त्यांचे बंधू रमेश आरबोळे यांना गडहिंग्लज कारखान्याच्या संचालकपदाची संधी मिळाली.
- कानडेवाडीचे सरपंच बाबासाहेब कुपेकर यांना जिल्हा परिषद सदस्य, काँगे्रस व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष, चारवेळा आमदार, मंत्री, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष, विधानसभा सभापतीपदाची संधी मिळाली.
- हलकर्णी ग्रामपंचायतीचे सदस्य राजकुमार हत्तरकी यांना जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे संचालक, वीरशैव बँक व ह्यगोकुळह्णच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली.
- गिजवणेचे उपसरपंच सतीश पाटील यांना पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, गडहिंग्लज साखर कारखाना संचालक, गडहिंग्लज अर्बन बँकेचे अध्यक्ष, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची संधी मिळाली.