गेल्यावर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेच्यावेळी येथील प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी ‘तिमारातूनी तेजाकडे’ या उपक्रमांतर्गत ही सेवा सुरू केली होती. त्यांनी स्वत: समुपदेशन करून अनेक कोविड रुग्णांना मानसिक आधार दिला होता. जीवनाबद्दलच्या सकारात्मक गोष्टी, ऑडिओ आणि व्हिडीओच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत पोहचून त्यांची जगण्याची आशा पल्लवीत करण्याचा प्रयत्न पांगारकर यांनी केला होता. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांनी येथील मानसशास्त्र शिकविणाऱ्या शिक्षकांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत पाच शिक्षक या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी झाले आहेत.
समुपदेशक शिक्षक व त्यांचे संपर्क क्रमांक असे - प्रा.डॉ. राजेंद्र गुंडे (९४२०१३१६५३), प्रा. एम. के. चव्हाण (९९२३२७८०५३), प्रा. विश्वनाथ पाटील (९०९६३९८६८९), प्रा. एम. एस. घस्ती (९४२१२०५३६६), सचिन हिरेमठ (९६६५२८१२९१).