कोल्हापूर : एस. टी. महामंडळाची अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज, वातानुकुलित शिवशाही बससेवेने मेट्रो सिटीसह आता ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे. गडहिंग्लज - निगडी या शिवशाही या दोन्ही बसेवेला कोल्हापूर - नाशिक ही गाडी रविवारी मध्यवर्ती बसस्थानक येथून सुरु झाली.खासगी वाहतूकदार आरामदायी बसगाडी भाड्यात सवलत देतात. त्यामुळे एस. टी. च्या प्रवासी संख्येत घट होत आहे. राज्य परिवहन महामंडळाने सुद्धा एस.टीचा मूळ प्रवासी टिकविणे आणि एस. टी. पासून दुरावलेला प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी शिवशाही ही बससेवा सुरू केली आहे.
तब्बल ५०० बस या राज्यभर टप्प्या-टप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत. हिरकणी म्हणजेच निमआराम प्रकारातील बसच्या तिकिटाच्या जवळपास जाणारेच शिवशाही बसचे तिकीट असल्याने माफक दरात वातानुकुलित बसने प्रवास मिळत असल्याने अल्पवधीतच ही गाडी लोकप्रिय झाली.
सध्या सुरु असलेली शिवशाही कोल्हापूर - पुणे, कोल्हापूर - पणजी, कोल्हापूर - मुंबई, कोल्हापूर - रत्नागिरी या मार्गावर या गाडीला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
या मार्गावर सुरु झाली गाडीगडहिंग्लज - निगडी : रात्री ८.३० वा.निगडी - गडहिंग्लज : रात्री ९ वा.कोल्हापूर - नाशिक : सकाळी ७.३० वा.नशिक - कोल्हापूर : सकाळी ६ वा.