कोल्हापूर, दि. 16 - सांगशी सैतवडेपैकी रेव्याची वाडी येथे वेताळ आश्रमजवळ दहीहंडीचा कार्यक्रम बघून घरी येत असताना गावातील पाण्याच्या टाकीजवळ पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यात महादेव चंद्राप्पा हाळे ( वय ६०, रा रेव्याची वाडी, ता. गगनबावडा) हे गंभीररित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ सीपीआर येथे उपचारसाठी दाखल केले. पायाला व हाताला मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अॅपल सरस्वती येथे दाखल केले. त्यांच्याबरोबर पांडुरंग वरेकर( वय ४०), रामचंद्र बाळू भारमल (वय ४५ ) हे किरकोळ जखमी झालेत, त्यांच्यावरही अॅपल सरस्वती येथे उपचार सुरू आहेत. तर शिवाजी वरेकर ( वय ४५,), पांडुरंग लटके (वय ४५) यांना ग्रामीण रुग्णालय गगनबावडा येथे उपचार सुरू आहेत. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी सीपीआर येथे भेट देऊन जखमींची विचारपूस केली.
गगनबावडा येथे हत्तीच्या हल्ल्यात 1 गंभीर, तर 4 किरकोळ जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 12:52 AM