साळवण :अत्यंत चुरशीने झालेल्या जि. प. पं. समिती निवडणूकीत गगनबावडा तालूक्यात काँग्रेसने जि. प. च्या दोन्ही व पं. स. च्या तीन जागा जिंकू धुरळा उडवला असून तालूक्यावर आपले निर्विवाद वर्चस्व पुन्हा एकदा सिध्द केले . तर भाजपाने पंचायत समितीची एक जागा जिंकूण भाजपाचे कमळ फूलवले. या निवडणूकीत शिवसेना व राष्ट्रवादीचे असळज जि.प. मध्ये डिपाँझिट जप्त झाले. गगनबावडा तालूक्यात पंचायत समितीच्या चार व जि. प. च्या दोन जागासांठी झालेल्या निवडणूकीत 88.44 टक्के मतदान झाले होते. झालेल्या मतमोजणीत तिसंगी जि. प. मतदार संघात काँग्रेसच्या भगवान पाटील यानी जिल्हा मध्यवर्ती बँकचे माजी अध्यक्ष पी.जी. शिंदे यांचा 1035 मतानी पराभव केला. तर शिवसेनेचे उमेदवार सलाउद्दीन उर्फ बंकट थोडगे तिस-या स्थानावर राहीले. तिसंगी पं. समितीमधून काँग्रेसच्या सौ. संगिता पाटील यानी भाजपाच्या सौ.राणी खाडे यांचा 1048 मतानी पराभव केला. तर कोदे पं. समितीमध्ये पांडूरंग भोसले यानी भाजपाच्या सतीश पाटील यांचा 605 मतानी पराभव केला. या दोन्ही ठिकाणी शिवसेना तिस-या स्थानी राहीली . तिसंगी जि, प.व कोदे प.स. या दोन जागा शिंदे गटाकडून यावेळी काँग्रेसने हिसकावून घेतल्या .असळज जि. प. मतदार संघात माजी आ. महादेवराव महाडीक यांच्या ताराराणी आघाडीची हवा चांगलीच तापली होती .त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. येथे काँग्रेसचे तालूका अध्यक्ष बजरंग पाटील यानी ताराराणीचे एम जी पाटील यांचा 330 मतानी पराभव केला .ही लढत काँग्रेस व ताराराणी आघाडीकडून प्रतिष्ठेची केली होती.मात्र येथे आ.सतेज पाटील गटाने बाजी मारुन आपले अस्तित्व कायम राखले. असळज पं.स.मधून काँग्रेसच्या सौ. मंगल संजय कांबळे यानी भाजपाच्या पंचशील कांबळे यांच्यावर 2230 अशा मोठ्या फरकाने विजय मिळवला. धुंदवडे पं. स. मध्ये भाजपाच्या आनंदा पाटील यानी काँग्रेसच्या संजयकुमार पाटील यांच्यावर 713 मतानी विजय मिळवून गगनबावडा तालूक्यात पहिल्यांदा कमळ फुलविले . निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकानी फटाका व गुलालाची उधळण करीत विजयी मिरवणूका काढल्या .गगनबावडा तालूक्यात ताराराणी आघाडीचे महादेवराव महाडीक यांची शिट्टी यावेळी नक्की वाजणार अशी हवा असताना आ, बंटी पाटील यानी त्यांच्या उमेदवारांचा पराभव करुन शिट्टीतील हवाच काढून घेतली अशी चर्चा .वेळी सुरु होती. (वार्ताहर)
विजयी उमेदवार व त्यांचे प्रतिस्पर्धी याना मिळालेली मते खालील प्रमाणे तिसंगी जि.प. भगवान पाटील (काँग्रेस) 4593 विजयी पी .जी .शिंदे (भाजप) 3559 सलाउद्दीन उर्फ बंकट थोडगे (शिवसेना) 3296 तिसंगी पं. समिती सौ. संगिता पाटील (काँग्रेस) 2701 विजयी सौ. राणी खाड्ये (भाजपा) 1653 सौ. नंदीनी पाटील ( शिवसेना ) 1513 कोदे पं. समिती -पांडूरंग भोसले (काँग्रेस) 2743 विजयी सतीश पाटील (भाजपा) 2138 हिंदूराव कुंभार (शिवसेना ) 813 असळज जि. प.-श्री बजंरग पाटील (काँग्रेस ) 5296 विजयी श्री एम जी पाटील (ताराराणी आघाडी ) 4966 श्री विनोद प्रभूलकर (शिवसेना ) 573 श्री प्रकाश पाटील ( राष्ट्रवादी) 339 असळज प. समिती सौ. मंगल संजय कांबळे ( काँग्रेस ) 3515 विजयी सौ. पंचशिला कांबळे (भाजप) 1285 सौ. रोहीणी कांबळे (शिवसेना ) 577 धुंदवडे पं. समिती -श्री आनंदा पाटील (भाजपा) 2790 विजयी श्री संजयकुमार पाटील (काँग्रेस) 2077 श्री बाबासो पाटील (शिवसेना ) 528