शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

गायकवाड कारखान्याची ‘एफआरपी’ मंगळवारपर्यंत, ‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 6:49 PM

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

ठळक मुद्दे‘स्वाभिमानी’च्या दणक्यानंतर प्रशासन नरमले साखर सहसंचालक कार्यालयात तासभर ठिय्या

कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दणक्यानंतर अखेर अथणी शुगर्स चालवीत असलेल्या बांबवडे (ता.शाहूवाडी) येथील उदयसिंहराव गायकवाड कारखान्याच्या प्रशासनाने थकीत एफआरपी मंगळवारपर्यंत (दि. ५) खात्यावर जमा करतो, अशी ग्वाही दिली.

संघटनेने शुक्रवारी दुपारी प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला. एफआरपी घेतल्याशिवाय उठणार नसल्याचा दम भरल्यानंतर साखर आयुक्त, सहसंचालक आणि कारखान्याचे प्रतिनिधी सागर पाटील यांनी फोनवरच बिले भागविण्याची हमी दिली.या कारखान्यांने २३०० रुपये प्रतिटन याप्रमाणे डिसेंबरअखेरचीच बिले दिली आहेत. हंगाम बंद झाला तरी बिले नसल्याने वैतागलेल्या शेतकऱ्यांनी शुक्रवारी दुपारी ‘स्वाभिमानी’च्या नेतृत्वाखाली लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयावरच हल्लाबोल केला.

जोरदार घोषणाबाजी करीत कारखान्यावर कारवाई का करीत नाही, कार्यालयाचे नेमके काम काय, दरवेळी आंदोलन केल्यानंतरच यंत्रणा हलणार काय, ‘आरआरसी’च्या कारवाया का थांबविण्यात आल्या, अशा प्रश्नांची सरबत्तीच केली. प्रशासनातर्फे कार्यालय अधीक्षक रमेश बारडे व विजय पाटील यांनी बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला.

जिल्हाधिकारी व आयुक्त स्तरावर कारवाईचे अधिकार असल्याचा सांगण्याचा प्रयत्न केला; पण संतप्त शेतकरी ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. कारवाईचे लेखी पत्र घेतल्याशिवाय आणि हातात बिले पडल्याशिवाय कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा घेतला.

अखेर तासभर प्रशासनाशी वाटाघाटी केल्यानंतर ५ मार्चपासून बिले जमा करणार असल्याचे जाहीर केल्यानंतरच शेतकरी कार्यालयातून बाहेर पडले. आंदोलनात अण्णा मगदूम, तानाजी वठारे, आशिष समगे, अमर पाटील, पद्मसिंह पाटील, संतोष पाटील, राजाराम पटील, बाबासो पाटील, संदीप पाटील, प्रदीप पाटील, अनिल पाटील, एकनाथ पाटील, एकनाथ पोवार, सागर शंभुशेटे सहभागी झाले.

उर्वरित कारखान्यांनीही थकीत एफआरपी लगेच द्यावी, साखर सहसंचालकांनी तशा सूचना द्याव्यात; नाही तर कार्यालयाला कुलूप ठोकल्याशिवाय राहणार नाही. येथून पुढे येताना एकेक कारखान्यासाठी येणार नाही, एकदमच येऊन पळता भुई थोडी करीन.भगवान काटे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना

 

 

 

टॅग्स :Farmerशेतकरीkolhapurकोल्हापूर