कोल्हापूर : पेन्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४२, रा. गोसावी गल्ली, यादवनगर, जयसिंगपूर) असे त्याचे नाव आहे. त्याने विविध ठिकाणी फसवणूक केलेले सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. त्याला न्यायालयाने उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.वृद्ध महिलांना पेन्शन मिळवून देतो, शासकीय योजनेतून फायदा मिळवून देतो अशा प्रकारची आमिषे दाखवून त्यांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने घेऊन फसवणूक करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अशा प्रकरणांचा वेगाने तपास सुरू करण्याच्या सूचना दिल्या.स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सचिन देसाई, आसिफ कलायगार आणि सुरेश पाटील यांचे एक पथक दि. १५ नोव्हेंबरला पेट्रोलिंग करताना पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर सांगली फाटा येथे रेकॉर्डवरील गुन्हेगार विशाल कांबळे हा दुचाकीसह उभा असल्याचे आढळले. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने पन्हाळा येथे एका वयोवृद्ध महिलेची फसवणूक केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून फसवणुकीचे सहा गुन्हे उघडकीस आले. या गुन्ह्यांतील दोन लाख रुपये किमतीचे ४१ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि दोन दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या.कोल्हापूरसह सांगलीतही गंडासंशयितांकडून जिल्ह्यातील पन्हाळा, कागल, कुरुंदवाड आणि जयसिंगपूर तसेच सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ येथे वृद्ध महिलांना पेन्शन आणि शासकीय योजनांचे आमिष दाखवून दागिने घेऊन फसवणूक केल्याचे उघडकीस आले, त्याने या गुन्ह्यांची कबुली दिली.
पेन्शनच्या आमिषाने वृद्धांचे दागिने लुटणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 10:42 AM
crimenews, police, kolhapurnews पेन्शन मिळवून देण्याच्या बहाण्याने वयोवृद्ध महिलांची फसवणूक करणाऱ्या भामट्याला अखेर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केली. विशाल कल्लाप्पा कांबळे (वय ४२, रा. गोसावी गल्ली, यादवनगर, जयसिंगपूर) असे त्याचे नाव आहे. त्याने विविध ठिकाणी फसवणूक केलेले सुमारे दोन लाखांचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले. त्याला न्यायालयाने उद्या, शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
ठळक मुद्देपेन्शनच्या आमिषाने वृद्धांचे दागिने लुटणारा गजाआड सहा गुन्हे उघड : दोन लाखांचे चोरीचे दागिने जप्त