येथील श्री गजानन नागरी सहकारी पतसंस्थेला गतवर्षी १ कोटी ३० लाखांचा ढोबळ तर आवश्यक तरतुदी वजा जाता ९४ लाख ४५ हजाराचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी दिली.
जोशी म्हणाले, कोरोनाच्या मुकाबल्यासाठी ५१ हजाराची मदत मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. डॉक्टर्स व परिचारिका यांना पीपीई किटही संस्थेतर्फे दिले आहेत. ३१ मार्चअखेर संस्थेचे भागभांडवल १ कोटी ४६ लाखाचे असून एकूण निधी ९ कोटी १७ लाखाचा आहे. ७४ कोटी ७९ लाखाच्या ठेवी असून ४१ कोटी ८८ कोटीची कर्जे आहेत. खेळते भांडवल ८९ कोटी १९ लाखाचे असून एकूण गुंतवणूक ४१ कोटी ९० कोटीची आहे. निव्वळ एनपीए शून्य टक्के असून सभासदांना सातत्याने १५ टक्के लाभांश दिला आहे, असेही जोशी यांनी सांगितले.