लोकमत न्यूज नेटवर्क
इचलकरंजी : येथील आयजीएम रुग्णालयात सर्व सोयी-सुविधा असतानाही रुग्णालय प्रशासनाकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. व्हेंटिलेटर वेळीच वापरात आणले असते, तर बहुतांश रुग्णांचा जीव वाचविता आला असता. प्रशासनाच्या या हलगर्जीपणाबद्दल रुग्णालयातील संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन ताराराणी पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.
निवेदनात, कोरोना रुग्ण मृत्युदरात इचलकरंजी अग्रस्थानी आहे. आमदार प्रकाश आवाडे हे रुग्णालयात सोयी-सुविधांसाठी पाठपुरावा करण्यासह याठिकाणच्या त्रुटीही मांडण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना हेळसांडपणा जीवघेणा ठरत असून, मृत्यूस जबाबदार संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, विलास गाताडे, संजय केंगार, दीपक सुर्वे, एम. के. कांबळे, आदींचा समावेश होता.
फोटो ओळी
०१०६२०२१-आयसीएच-०२
इचलकरंजीतील आयजीएम प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल रुग्णालयातील संबंधितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशा मागणीचे निवेदन ताराराणी पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना दिले.