शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गांधी जयंतीला वीस कैद्यांची सुटका होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 12:53 AM

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, निटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. त्यापैकी वीस कैद्यांना २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त कारागृहातून घरी सोडले जाणार आहे. कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा ...

एकनाथ पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कारागृहात आल्यापासून चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, निटनेटकेपणा, कष्ट करण्याची तयारी, इतरांशी आपुलकीने बोलणे अशा सर्वसंपन्न गुण प्राप्त केलेल्या कैद्यांना दोन ते अडीच वर्षांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. त्यापैकी वीस कैद्यांना २ आॅक्टोबरला गांधी जयंतीनिमित्त कारागृहातून घरी सोडले जाणार आहे. कारागृह प्रशासनाने या कैद्यांच्या सुटकेचा आगळा-वेगळा निरोपाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. यंदाची दिवाळी या कैद्यांना कुटुंबासोबत साजरी करण्याचे भाग्य मिळाले आहे. या गोड बातमीने कुटुंबीयांचा आनंदही ओसंडून वाहत आहे. गेल्या दोन वर्षांत शिक्षा माफ झालेल्या सुमारे ४५० कैद्यांना कारागृहातून घरी सोडले आहे.२ आॅक्टोबर या गांधी जयंतीला यंदा दीडशे वर्षे पूर्ण होत असल्याने गांधी वर्ष साजरे करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यानुसार नियमात बसलेल्या ६० वर्षांवरील पुरुष व ५५ वर्षांच्या पुढील महिला कैद्यांची शिक्षा माफ करून त्यांना घरी सोडण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला आहे. त्यांच्या निरोपाचा कार्यक्रम एकाचवेळी देशातील तीन हजार कारागृहांत आयोजित केला आहे. महाराष्टÑात ५२ कारागृह आहेत. समाजातील काही व्यक्तींकडून कळत-नकळतपणे, अनवधानाने किंवा रागाच्या भरात घडलेल्या एका चुकीमुळे अनेक तरुण विविध बंदी कारागृहांत न्यायालयाने दिलेली शिक्षा भोगत आहेत. जीवनातील उमेदीचा काळ कारागृहातच जातो.सात ते चौदा वर्षे आणि आजन्म कारावास अशी शिक्षेची तरतूद आहे. कारागृहात पडेल ते काम करण्याची तयारी, चांगली वर्तणूक, शांत स्वभाव, आपुलकीने बोलणे, आदी कैद्यांच्या रोजच्या दिनमानाची नोंद कारागृहात ठेवली जाते. चार वर्षे शिक्षा चांगल्या प्रकारे भोगली आहे व कैद्यांच्या मानसिकतेत चांगला बदल झाला आहे, याची खात्री कारागृह अधीक्षकांना झाल्यानंतर ते शासनाच्या कक्षेत राहून कैद्यांना शिक्षेत सूट देतात.१९८५ कैद्यांचामुक्काम कारागृहातकळंबा कारागृहात मुंबई, ठाणे, कल्याण, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आदी ठिकाणांचे १९१४ पुरुष व ७१ महिला असे १९८५ कैदी या ठिकाणी शिक्षा भोगत आहेत. कैद्यांना ठेवण्यासाठी सर्वसोयींनी-युक्त११ बरॅक्स या ठिकाणी आहेत.कमिटीच्या निर्णयानंतर सुटकाखुनाच्या गुन्ह्यांत आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या कारागृहातील दोन महिलांसह पंधरा कैद्यांना आतापर्यंत चौदा वर्षांच्या शिक्षेनंतर घरी सोडून दिले आहे. या शिक्षेत कैद्याला शेवटच्या श्वासापर्यंत कारागृहात राहावे लागते; परंतु त्याची वर्तणूक चांगली असेल, त्याचे वय ६५ च्या पुढे असेल तर शासनाने नियुक्तकेलेले कारागृह अधीक्षक, जिल्हा शल्य चिकित्सक यांची कमिटी या कैद्यांना सोडण्याचा निर्णय घेते.