शिवाजी विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अधिविभागाच्या विशेष ऑनलाइन व्याख्यानमालेअंतर्गत दुसरे पुष्प त्यांनी ‘नवोन्मेषप्रणित गतिमान समावेशी वृद्धी’ या विषयावर गुंफले. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते. समावेशी नवोन्मेष व वृद्धीसाठी ‘गांधीयन अभियांत्रिकी’ हा अत्यंत मूलभूत व नैसर्गिक मार्ग आहे. ‘आपली वसुंधरा प्रत्येक माणसाची गरज भागेल, इतके जरूर देते; प्रत्येकाची हाव भागविण्यास मात्र ती अक्षम आहे,’ हा गांधीविचार त्याचा पाया आहे. कमीत कमी संसाधनांच्या वापरातून अधिकाधिक लोकांसाठी अधिकाधिक, दर्जेदार साधन-सुविधांची निर्मिती करणे हा त्याचा गाभा आहे. त्या दृष्टीने नवोन्मेषाकडे, नवनिर्माणाकडे पाहायला हवे, असे डॉ. माशेलकर यांनी सांगितले. देशातील सामाजिक-आर्थिक असमानता आणि दारिद्र्य यांच्यावर आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मात करता येऊ शकते, याची ठोस जाणीव डॉ. माशेलकर यांनी करून दिली. त्याचे अनुसरण गरजेचे असल्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी सांगितले. ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ डॉ. यशवंतराव थोरात यांनी स्वागत केले. अर्थशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. ज्ञानदेव तळुले यांनी प्रास्ताविक केले.
डॉ. माशेलकर म्हणाले
शिक्षण आणि योग्य पूरक संधी यांच्या संयुक्त बळावरच आपले आणि देशाचे भवितव्य अवलंबून
डिजिटल तंत्रज्ञानाची दरी सांधणे, डिजिटल समावेशन वाढविण्याची गरज
शिक्षणाचा अधिकारही महत्त्वाचा
फोटो (२३०८२०२१-कोल-रघुनाथ माशेलकर (व्याख्यान)
230821\23kol_13_23082021_5.jpg
फोटो (२३०८२०२१-कोल-रघुनाथ माशेलकर (व्याख्यान)