शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

गणेशमूर्तींसाठी कुंभारवाड्यात लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 12:46 AM

कोल्हापूर : करोडो भक्तांचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनाला आता दोन महिने राहिल्याने कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. त्यामुळे शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, पापाची तिकटी या कुंभार वसाहतींमध्ये घरोघरी गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू आहे.गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण. कुटुंबातील लहानग्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंतच्या भक्तांच्या लाडक्या ...

कोल्हापूर : करोडो भक्तांचे आराध्य दैवत श्री गणेशाच्या आगमनाला आता दोन महिने राहिल्याने कुंभार बांधवांचे हात आकर्षक गणेशमूर्ती साकारण्यात गुंतले आहेत. त्यामुळे शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, बापट कॅम्प, पापाची तिकटी या कुंभार वसाहतींमध्ये घरोघरी गणेशमूर्ती बनविण्याची लगबग सुरू आहे.गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वांत मोठा सण. कुटुंबातील लहानग्यांपासून ते आजी-आजोबांपर्यंतच्या भक्तांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सर्वांनाच उत्सुकता आहे. मात्र, यावर्षी अधिक महिना आल्याने दरवर्षी आॅगस्टमध्ये येणारा गणेशोत्सव यंदा १३ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे कुंभारबांधवांना गणेशमूर्ती घडविण्यासाठी अधिक वेळ मिळाला आहे. आता उत्सवाला दोन महिने राहिल्याने कुंभारबांधवांच्या घराघरांत वेगवेगळ्या स्वरूपांतील आकर्षक गणेशमूर्ती आकाराला येत आहेत. गंगावेश, पापाची तिकटी आणि शाहूपुरी कुंभार गल्लीत प्रत्येक घराच्या दारात गणेशमूर्तींसाठी मांडव उभारण्यात आले आहेत. मार्केट यार्डमध्ये अनेकजणांचे गाळे असल्याने तेथेही काम सुरू आहे.सध्या तयार गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरविण्याचे काम सुरू आहे. घरगुती आणि मंडळांच्या गणेशमूर्तींचे कोरीव काम केले जात आहे; तर अनेक कुंभारांकडून कच्च्या गणेशमूर्ती परगावी पाठविल्या जात आहेत. मोजक्या घरांमध्ये मूर्तींचे रंगकाम सुरू झाले आहे.पर्यावरणपूरकमूर्तींना मागणीनागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी प्रबोधन झाल्याने गेल्या काही वर्षांत शाडूच्या आणि कागदाच्या लगद्याच्या मूर्तींना मागणीवाढली आहे. घरगुतीसह मंडळांनीही पर्यावरणपूरक गणेशमूर्तींसाठी मूर्तिकारांकडे नावनोंदणी केली आहे. याशिवाय निसर्गमित्र, चेतना विकास मंदिर या संस्थांकडूनही इको-फ्रेंडली गणेशमूर्ती घडविल्या जात आहेत.‘जी.एस.टी.’मुळे १८ टक्क्यांनी दरवाढगतवर्षी केंद्र शासनाने लागू केलेल्या जी.एस.टी.मुळे गणेशमूर्तींच्या दरातही वाढ झाली आहे. मूर्ती घडविण्यासाठी लागणारे प्लास्टर आॅफ पॅरिस, गबाळ आणि रंग या सगळ्यांचा मिळून जवळपास १८ टक्के जीएसटी जातो. त्यामुळे गणेशमूर्तींचेही दर १८ टक्क्यांनी वाढणार आहेत.