कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांच्या गजरात कोल्हापूरात साव॔जनिक गणेश विसर्जन मिरवणूकीला प्रारंभ झाला. खासबागेत आज सकाळी साडेनऊच्या सुमारास मानाच्या गणपतीच्या पालखीचे पूजन करून सार्वजनिक गणेशोत्सव मिरवणुकीस प्रारंभ झाला. गणेश पूजन करून आरतीनंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सतेज पाटील, महापौर माधवी गवंडी, पोलीस महासंचालक डॉ. सुहास बराले, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, राष्ट्रवादीचे आर. के. पोवार, ऍड. धनंजय पठाडे, शिवसेनेचे विजय देवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सकाळी ११ वाजेपर्यंत कोल्हापूर नगरपालिकेतील ४२ आणि तालुक्यातील १२ असे मिळून एकुण ५४ गणपती मूर्तीचे विसर्जन झाले. पंचगंगा नदीवर १०० च्या वर गणपतींचे विसर्जन करण्यात आले.
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीस प्रांरभ करताना, महापुरासह विस्कटलेले निसर्ग चित्र नियमित होऊ दे , असे साकडे घातले , तसेच काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदी निवड झालेल्या आमदार सतेज पाटील यांना शुभेच्छाही दिल्या.मिरवणूक जलद गतीने पुढे सरकत आहे. केवळ ढोल ताशे अशी वाद्ये आहेत. आतापर्यंत साऊंड सिस्टीम कोणी आणली नाही.