कोल्हापूर: जिल्ह्यातील वळीवडे येथील कार्यक्रमासाठी कोल्हापूरात आलेले पोलंड मधील नागरिकानी खासदार संभाजी राजे छत्रपती यांच्या समवेत ते गणेश विसर्जन मिरवणूक पाहिली तसेच यावेळी पोलंडवासीय महिलांनी लेझीम खेळण्याचा मनमुराद आनंद लुटला.
पोलंडचे उप परराष्ट्रमंत्रीमार्सीन प्रीझीदॅज शुक्रवार 13 आणि शनिवार 14 सप्टेंबर रोजी दोन दिवस कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. 1942 ते 1948 या काळात पेालंडचे 5 हजार नागरिक निर्वासित म्हणून वळीवडेच्या ज्या भागात रहात होते, तेथे उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचे अनावरण प्रीझीदॅज यांच्या हस्ते 14 सप्टेंबर रोजी होणार आहे. पोलंडचे नागरिक या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वळीवडे 1942 ते 1948 या काळात आपले बालपण व्यतीत केलेले पोलंडचे नागरिकही येणार आहेत. हे नागरिक 12 सप्टेंबर ते 15 सप्टेंबरपर्यंत कोल्हापूर येथे राहणार आहेत.