शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

गणेशमूर्तींनी स्टॉल सजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:25 AM

कोल्हापूर : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे १३ दिवस राहिल्याने शहरातील कुंभारवाड्यात व उपनगरांमध्ये गणेशमूर्तीचे स्टॉल सजले आहेत. सिंहासन, ...

कोल्हापूर : लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे १३ दिवस राहिल्याने शहरातील कुंभारवाड्यात व उपनगरांमध्ये गणेशमूर्तीचे स्टॉल सजले आहेत. सिंहासन, उंदरावर बसलेला, जास्वंदीचे फूल, कोल्हापुरी फेटा, धोतर अशा वेगवेगळ्या रूपातील आकर्षक गणेशमूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहेत. दुसरीकडे कुंभारवाड्यातील घराघरात अन्य गणेशमूर्तींवर अखेरचा हात फिरवला जात आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पाचा उत्सव १० सप्टेंबरपासून सुरू होत आहेत. यंदा महापुराने गणेशमूर्तींचे नुकसान झाले असले तरी कोल्हापूरकरांची गरज भागेल एवढ्या मूर्ती कुंभारांनी तयार केल्या आहेत. या तयार मूर्तींचे बुकींग आता सुरू झाले आहे. शहरातील शाहूपुरी कुंभार गल्ली, गंगावेश, बापट कॅम्प येथील कुंभार वाड्यांमधील घरांबाहेर आता गणेशमूर्ती मांडले आहेत. दिवसभरात नागरिक मूर्तीची निवड करून त्याचे बुकींग करून जात आहेत. याशिवाय पाचगाव, संभाजीनगर, कळंबा, आर. के. नगर, फुलेवाडी, साने गुरुजी वसाहत या उपनगरांमध्येदेखील मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तीं बुकींगसाठी मांडण्यात आले आहेत. सलग दोन वर्षे कोरोना आणि महापूर अशा संकटांमुळे काही प्रमाणात गणेशमूर्तींचे दर वाढले आहेत.

--

कुंभारांकडील मूर्तींची एकदम खरेदी

उपनगरांमध्ये कुंभार समाज फार नसला तरी तेथील नागरिकांच्या सोयीसाठी गणेशमूर्ती उपलब्ध होतात. येथील व्यावसायिक कुंभारांकडून घावूक रकमेत गणेशमूर्ती विकत घेतात आणि नागरिकांना विकतात. कुंभारांचे वर्ष गणेशमूर्ती बनवण्यात जाते. परत त्यांची विक्री करत बसण्याऐवजी एकदमच मूर्ती दिल्या जातात त्यामुळे कुंभार, विक्रेते आणि नागरिक यांनाही सोयीस्कर होते.

---

कुंभारवाड्यात लगबग

एकीकडे मूर्तींचे बुकींग दुसरीकडे रंगकाम शिल्लक राहिलेल्या मूर्तींवर अखेरचा हात फिरवणे या कामात सध्या कुंभार बांधव व्यस्त आहेत. कोणी रंगकाम करतय, कोण डोळे रेखाटतंय, कोण बुकींग करतंय, कोण सोंड रंगवतंय.. असे अख्खे कुटुंब भाविकांचा देव घडवण्यात गुंतले आहेत.

फोटो व ओळ स्वतंत्र पाठवली आहे.

--