शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

Ganeshotsav : कोल्हापूर : पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांचा गौरव : अभिनव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 11:23 AM

यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्दे पारंपरिक वाद्यांचा वापर करणाऱ्या मंडळांचा गौरव : अभिनव देशमुखयंदाही डॉल्बीमुक्त गणेशोत्सव : मंडळांच्या कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

एकनाथ पाटील

कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सव’ साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात होणाऱ्या सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बीवर निर्बंध घालण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना सार्वजनिक मंडळांच्या प्रबोधनावर भर देण्याबरोबरच मंडळांना कायदेशीर नोटिसा पाठवून डॉल्बीपासून रोखण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश दिले आहेत. मी स्वत: प्रत्येक पोलीस ठाण्यास भेट देऊन हद्दीतील मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे.

पोलीस प्रशासनाने २०११ मध्ये गणेशोत्सव डॉल्बीमुक्त करण्यासाठी पावले उचलली. यंदाही कोल्हापूर, इचलकरंजीसह उपनगरातील प्रत्येक मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वैयक्तिक बैठका घेत त्यांचे प्रबोधन करण्याचा प्रयत्न सुरू आहे. कायद्याच्या पलीकडे जाऊन ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केल्यास मानवी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात, हे वैद्यकीयदृष्ट्या पटवून दिले जात आहे. यापूर्वी डॉल्बी लावणाऱ्या ७५ तरुण मंडळांच्या २२५ कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.

बहुतांश सार्वजनिक तरुण मंडळांमध्ये तरुणांचा सहभाग मोठा असतो. पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार डॉल्बीवर कारवाई झाल्यास त्यामध्ये पाच वर्षे कारावासाची शिक्षा व एक लाख रुपये दंड, अशा दोन्ही शिक्षा होऊ शकतात; त्यामुळे पासपोर्ट, शासकीय, निमशासकीय नोकरीस हजर होताना अडचणी निर्माण होऊन बहुसंख्य तरुणांच्या भविष्याचे नुकसान होऊ शकते. याबाबतची जनजागृती मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये करण्यात येत असल्याचे डॉ. देशमुख यांनी सांगितले.मंडळांना आवाहनगणेशोत्सवात स्वागत व विसर्जन मिरवणुकीमध्ये सार्वजनिक मंडळांनी पारंपरिक वाद्यांचा वापर करावा. कोल्हापूरच्या ऐतिहासिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे देखावे पुढे आणावेत. शिवकालीन मर्दानी खेळ, क्रीडा, लेझीम, ढोलताषे, पोवाडे, अशा पारंपरिक कलांचे मिरवणुकीत दर्शन घडावे, जेणेकरून प्रत्येक कुटुंब मिरवणूक पाहण्यासाठी घराबाहेर पडेल.

विशेषत: महिलांच्यात सुरक्षेची भावना तयार होईल. मिरवणुकीत पुढे-मागे घेण्यावरून वाद निर्माण होतात. अशावेळी सामंजस्याची भूमिका घेत मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी पुढाकार घेणाºया प्रमुख कार्यकर्त्यांसह विधायक भूमिका पार पाडणाºया सार्वजनिक मंडळांचा विशेष गौरव पोलीस दलाच्या वतीने करण्यात येणार आहे.डॉल्बीच्या दृश्य परिणामांबाबत प्रबोधनकायद्याच्या पलीकडे जाऊन ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केल्यास मानवी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामध्ये वृद्ध नागरिक, लहान बालके, गर्भवती स्त्रिया, मानवी श्रवण यंत्रणा, रक्तदाब, हृदयरोग, अर्धांगवायू असे आजार होण्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे; त्यामुळे यंदाही डॉल्बीविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व मंडळांना पोलीस दलाच्या वतीने केले जात आहे. सोशल मीडियाद्वारेही त्याचे प्रबोधन केले जात आहे.‘एक गाव एक गणपती’ गावांचा गौरवजिल्ह्यामध्ये गटतट बाजूला ठेवून गावची ऐकी टिकविण्यासाठी ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना राबविणाऱ्या गावांचा विशेष गौरव केला जाईल. त्यांना विशेष प्रशस्तीपत्र दिले जाईल.

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवkolhapurकोल्हापूर