शहरं
Join us  
Trending Stories
1
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
2
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
3
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
4
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
5
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
6
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
7
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
8
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
9
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
10
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
11
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
12
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
13
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 
14
तिरुपती लाडू भेसळ प्रकरणाचा तपास एसआयटीकडून स्थगित, सांगितलं 'हे' कारण...
15
विराट कोहलीपेक्षा अब्दुला शफीकचा रेकॉर्ड चांगला आहे; पाकिस्तानच्या कर्णधाराचा दावा
16
"अंबानींच्या लग्नावर करोडोंचा खर्च, पण शेतकरी...", राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
सासूच्या मृत्यूची बातमी, तरीही सेटवर हसत होती 'ही' अभिनेत्री, नवऱ्याने असं केलं रिएक्ट
18
“भाजपासाठी महाराष्ट्र हे ATM, मोदी-शाह यांच्या दौऱ्याचा मविआलाच फायदा”; काँग्रेसची टीका
19
"विमानांप्रमाणे आता एसटीच्या ई- शिवनेरी बसमध्ये दिसणार शिवनेरी सुंदरी’’, भरत गोगावले यांची घोषणा
20
Irani Cup 2024 : मैं हूँ ना! मुंबईचा खडतर प्रवास; पण अजिंक्य रहाणेचा 'संयम', अय्यर-सर्फराजची चांगली साथ

विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या टोळीस अटक, तीन महिलांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2021 12:51 PM

विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली.

राशिवडे : विवाह इच्छुक युवकांना हेरून लाखोंची फसवणूक करणाऱ्या इचलकरंजी येथील टोळीस राधानगरी पोलिसांनी आज अटक केली. यामध्ये तीन महिलांसह एका पुरुषाचा समावेश आहे. याबाबत राधानगरी तालुक्यातील म्हासुर्ली पैकी जोगमोडी वाडी येथील विक्रम केशव जोगम (वय २४)  यांनी याबाबत राधानगरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या टोळीकडून आणखीन काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

याबाबत माहिती अशी की, विक्रम जोगम यांचा विवाह दि.२२ जून २०२१ रोजी म्हासुर्लीपैकी जोगमवाडी येथे वैशाली संजय शिंदे (वय३८, रा.चांदणी चौक तारदाळ ता. हातकणंगले) हिच्याशी झाला. यावेळी विवाह ठरविण्यासाठी संजय विठ्ठल शिंदे, फिरोज बाबु शेख, समिना फिरोज शेख (रा.शाहुनगर चंदुर सध्या रा.ठाकरे चौक जवाहरनगर इचलकरंजी) यांनी फिर्यादीकडून एक लाख पाच हजार रुपये घेतले.

हा विवाह ठरविताना यापुर्वी झालेल्या तीन विवाहाची माहिती ही लपवून ठेवली. तर विक्रम जोगम यांचेकडून घेतलेली रक्कम आपापसात वाटून घेतली. त्यानुसार संबधीतांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानुसार चार आरोपींना इचलकरंजी येथुन राधानगरीचे पोलीस निरीक्षक आण्णासो कोळी, पो.कॉ. सुरेश मेटील यांनी ताब्यात घेत मुसक्या आवळल्या.यासंदर्भात आणखीन कोणाची फसवणुक झाली असेल तर त्यांनी राधानगरी पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस निरीक्षक आप्पासो कोळी यांनी केले आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरradhanagari-acराधानगरीmarriageलग्नCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी