लोकमत न्यूज नेटवर्क --कोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेत ‘बावड्याच्या सरदारा’ने ढपला पाडल्याच्या घोटाळा उघडकीस आणल्यामुळेच महापालिकेतील लुटारूंची टोळी सैरभैर झाली आहे. त्यातूनच त्यांची भाजप-ताराराणी आघाडीवर निराधार आणि बाष्फळ चिखलफेक सुरू आहे. आपल्या बगलबच्च्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यापेक्षा ‘सरदारा’ने स्वत:च सामोरे यावे, असे आव्हान मंगळवारी ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी पत्रकाद्वारे दिले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कदम यांनी म्हटले आहे की, केवळ थेट पाईपलाईन योजनाच नव्हे तर महापालिकेतील प्रत्येक कामात आणि प्रकल्पात या लुटारू टोळीने ‘ढपला’ पाडला आहे. त्याचा मुख्य वाटा इमाने-इतबारे ‘बावड्यातील सरदारा’कडे पोहोचविला जातो. इथल्या भ्रष्ट कारभाराला वेसण घालण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळेच सरदार आणि त्यांची टोळी भयभीत झाली आहे. त्यातून तेच-तेच निराधार व अप्रस्तुत बाष्फळ आरोप केले जात आहेत. रस्ते प्रकल्पात ज्या सरदारने ढपला पाडला त्याला कोणावर बोट दाखविण्याची नैतिकता नाही. दारू दुकाने सुरू करण्याची सुपारीसर्वोच्च न्यायालयाने राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील दारू दुकाने बंद करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु तरुण पिढीला व्यसनाधीन बनविणाऱ्या मद्य व्यावसायिकांच्यावतीने शहरात अशी दुकाने पुन्हा सुरू करण्यासाठी काही कोटींची ‘सुपारी’ याच सरदाराने घेतली आहे, असा नवा आरोप सत्यजित कदम यांनी केला आहे. तो गाळा रितसर खरेदी केला १ ज्या दुकानगाळ्याबाबत माझ्यावर लुटारू टोळीने आरोप केला आहे तो गाळा रितसर सन २००८ मध्ये खरेदी केला आहे. त्यावेळी माझा व राजकारणाचा संबंध नव्हता. २ फेरीवाल्यांचा एवढा पुळका होता तर त्यांना एका कोपऱ्यात टाकून तिच जागा या सरदाराने ‘बिल्डर’च्या घशात का घातली? असा सवाल कदम यांनी केला आहे. महानगरपालिकेच्या हद्दीतील एक इंचाचे आरक्षण आम्ही उठविलेले नाही. ३ ‘सरदारा’सारख्या ‘देवस्थान’च्या, धनगर बांधवांच्या महानगरपालिकेच्या जागा हडप केलेल्या नाहीत, असेही कदम यांनी म्हटले आहे.याची उत्तरे द्या : कदम राजन श्रीवास्तवला जाळून कोणी मारले?शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्णात कोणी अडकविले?पाचगावच्या खून प्रकरणातील आरोपीचा संसार कोण चालवितो? केबल व्यावसायिकाच्या संशयास्पद खुनाचा सूत्रधार कोण? बिडी कामगार चाळीतील तरुण कार्यकर्त्याची गेम कोणी केली?
घोटाळा उघड केल्याने टोळी सैरभैर
By admin | Published: May 10, 2017 1:12 AM