शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या पुढाऱ्यांचा राग माझ्यावर काढू नका"; अजित पवार ग्रामस्थांशी काय बोलले?
2
शरद पवार गटाचे उमेदवार समजीत घाटगे अंतरवालीत; मनोज जरांगेंची घेतली भेट, २ तास चर्चा
3
शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते काँग्रेसच्या प्रचारात; भाजपच्या बंडखोर महिला नेत्याचा मोठा दावा
4
महायुतीत बंडखोरांचा ३६ चा आकडा, त्यापैकी १९ भाजपाचे; बंड शमले नाहीतर युती-आघाडीला ५० जागांवर फटका
5
धनंजय मुंडे यांच्या २०१९ च्या शपथपत्रात तीन, तर २०२४ मध्ये पाच अपत्यांचा उल्लेख!
6
'इमर्जन्सी' ही प्रोपोगंडा फिल्म आहे का? श्रेयसने विचारलेला कंगनाला प्रश्न! अभिनेत्री म्हणाली-
7
"तू तो गया"! सिली पॉइंटवर Sarfaraz Khan चं रचिन विरुद्ध 'स्लेजिंग'; व्हिडिओ व्हायरल
8
८ नोव्हेंबरपासून 'या' कंपनीचा IPO खुला होणार; प्राईज बँड ₹२४, परदेशात आहेत कंपनीचे ग्राहक
9
“मनोज जरांगेंच्या रुपात देशाला आधुनिक गांधी, आंबेडकर, मौलाना आझाद मिळाले”; कुणी केले कौतुक?
10
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
11
नेत्रदिपक भरारी! मेडिकलचं करिअर सोडलं, काहीतरी मोठं करायचं ठरवलं; झाली अधिकारी
12
"मी ठासून सांगतोय माघार घेणार नाही"; वर्षा बंगल्यावरील भेटीनंतर सरवणकरांची स्पष्ट भूमिका
13
Maharashtra Election 2024: महाविकास आघाडीचा गेम बिघडवणार?; ११ बंडखोर कोण आहेत?
14
अमिषा पटेलनं का नाकारला होता शाहरुख खानचा 'चलते चलते'?, अभिनेत्री म्हणाली - "मला..."
15
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
16
तरुणीचा व्हिडीओ कॉल उचलला आणि हनिट्रॅपमध्ये अडकले मंत्री, त्यानंतर घडलं असं काही...
17
Video - "RC, ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही, पकडलं तर फक्त भाजपाची डायरी दाखवा, पोलीस..."
18
Gautam Adani News : अदानींनी नेमकं केलंय तरी काय? 'या' कंपनीच्या मागे का लागल्यात PNB, ICICI सारख्या बँका?
19
'सुंदर' चेंडू अन् 'कॉपी पेस्ट फॉर्म्युला'! टॉम लॅथमसह रचिन झाला क्लीन बोल्ड (VIDEO)
20
कार्तिक आर्यन-विद्या बालनचा 'भूल भूलैय्या ३' कसा आहे? पहिला Review आला समोर

Kolhapur News: कष्टकऱ्यांच्या वस्तीत, गुंडांची मस्ती; बोंद्रेनगर दहशतीखाली

By उद्धव गोडसे | Published: March 17, 2023 12:03 PM

चौकात किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर थांबून टवाळक्या करणारी तरुणांची टोळकी मुलींची छेड काढण्यात आघाडीवर

उद्धव गोडसेकोल्हापूर : उपनगर आणि खेड्याची संमिश्र वस्ती. काही कुलूपबंद घरे, तर काही घरांच्या बाहेर खेळणारी चार-पाच लहान मुले. एक-दोन ठिकाणी लसूण निवडत बसलेल्या वयोवृद्ध बायका, तर एका ठिकाणी म्हशींचा चारा-पाणी करण्यात गुंतलेला म्हातारा आणि मुख्य रस्त्यालगत एका पान टपरीसमोर दंगामस्तीत दंग असलेलं छपरी तरुणांचं टोळकं. हे चित्र आहे बोंद्रेनगरातील धनगरवाड्याचे. नात्यातीलच तरुणाच्या त्रासाला कंटाळून बुधवारी (दि. १५) एका तरुणीने आत्महत्या केल्यानंतर यावर बोलणेही स्थानिक नागरिक टाळत आहेत.हातावरचे पोट असलेल्या कष्टकऱ्यांची वसाहत म्हणून ओळख असलेल्या बोंद्रेनगर परिसरात मागील पिढीने स्वत:चे अस्तित्व निर्माण केले. गगनबावडा, राधानगरी आणि शाहूवाडी तालुक्यांच्या धनगरवाड्यांमधून कामाच्या शोधात कोल्हापुरात आलेल्या लोकांनी बोंद्रेनगरात आपला तळ ठोकला.

सुरुवातीला आसपासच्या खेड्यात शेतीची कामे केली. झाडांच्या फांद्या तोडणे, जांभूळ, करवंदे विकणे अशी कामे सुरूच असतात. हळूहळू महिलांना धुणीभांडी, घरकाम अशी मोलकरणीची कामे मिळू लागली. यात चार पैसे मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांचे नातेवाईक, पै-पाहुणे असा गोतावळा जमा झाला. काही तरुणांनी लक्ष्मीपुरीत हमाली केली, तर काहींनी कांदे-बटाटे आणि लसूण विक्रीचा व्यवसाय करून आपला जम बसवला. आज सुमारे दोनशे कुटुंबे या परिसरात राहत आहेत.कष्टाच्या कामात मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आता दुसरी पिढी भरकटल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांपासून बेरोजगारी, व्यसनाधीनता, खासगी सावकारी आणि तरुणांच्या हुल्लडबाजीमुळे या परिसराला समस्यांचे ग्रहण लागले आहे. काही कुटुंबांचा अपवाद सोडला तर अनेक कुटुंबातील तरुणांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले आहे. मिळेल ते काम करून चार पैसे मिळवण्याचा प्रयत्न यांच्याकडून होतो.

मात्र, यातील बराच पैसा व्यसनांवर खर्च होतो. काही तरुण तर आई-वडिलांच्या पैशावर केवळ मजा मारत फिरतात. त्यातून हुल्लडबाज तरुणांची टोळकी निर्माण झाली आहेत. त्यांचाच शालेय मुलांवर प्रभाव वाढताना दिसतोय.

छपरी तरुणांची टोळकीचित्रविचित्र हेअरस्टाईल्स, हातावर, मानेवर काढलेले टॅट्यू, आखूड पँट किंवा बरमुडे, भडक रंगाचे शर्ट आणि तोंडात मावा किंवा गुटख्याचा तोबरा. चौकात किंवा गल्लीच्या कोपऱ्यावर थांबून टवाळक्या करणारी तरुणांची टोळकी मुलींची छेड काढण्यात आघाडीवर आहेत. अशा टोळक्यांचा बंदोबस्त व्हावा, अशी अपेक्षा या परिसरातील महिला व्यक्त करतात.पाच वर्षांत तीन घटनागेल्या पाच वर्षांत या परिसरात तीन तरुणींनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. यातील दोन तरुणींनी हुल्लडबाजांच्या त्रासाला कंटाळून गळफास घेतला, तर एका तरुणीसाठी नात्यातील व्यक्तीच जीवघेणी बनली. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारी