कोल्हापूर : घराच्या परिसरातील कचरा उघड्यावर जाळल्याबद्दल मंगळवारी रुईकर कॉलनी प्रभागातील दोन नागरिकांना प्रत्येकी २०० रुपयांचा दंड उपायुक्त निखिल मोरे यांनी केला.स्वच्छ सर्व्हेक्षणांतर्गत शहरात सुरू असलेल्या स्वच्छता कार्यक्रमाची उपायुक्त निखिल मोरे आणि सहायक आयुक्त संदीप घार्गे यांनी सोमवारी (दि. २३) सकाळी साडेसहा वाजता अचानक भेट देऊन पाहणी केली. यावेळी रुईकर कॉलनी प्रभागातील दोन नागरिक कचरा जाळत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तत्काळ त्यांनी आरोग्य पथकामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली.शहर प्रदूषणमुक्त होण्यासाठी तसेच येथील हवेची गुणवत्ता स्वास्थ्यपूर्ण राहावी, यासाठी महानगरपालिकेच्या वतीने शहरभर सफाई आणि स्वच्छतेवर भर दिला आहे.
आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रदूषणमुक्तीसाठी स्वच्छतेवर अधिक भर द्यावा, शहरात उघड्यावर कचरा व पालापाचोळा जाळला जाणार नाही, याची दक्षता घेण्याबरोबरच रस्त्यांची दैनंदिन स्वच्छता नियमितपणे करावी, तसेच धुळीचे कण कमी करण्यासाठी स्वच्छतेवर भर द्यावा, असे आवाहनही उपायुक्त मोरे यांनी केले.तक्रारीची जागेवरच सोडवणूक करावीनागरिकांच्या आरोग्य व स्वच्छताविषयक तक्रारीची आरोग्य कर्मचाऱ्यांनी जागेवरच सोडवणूक करावी, असे निर्देश उपायुक्त मोरे यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिले. मोरे आणि सहायक आयुक्त घार्गे यांनी अचानकपणे शहरातील कळंबा फिल्टर हाऊस येथील सॅनिटरी वॉर्ड ऑफिसमधील ए-१ व ए-२ या विभागांना मंगळवारी सकाळी अचानक भेट देऊन पाहणी केली. तसेच नागरिकांशी संवाद साधून स्वच्छताकामाची माहिती घेतली. हजेरीपत्रक तपासून उपस्थितीबाबत पडताळणी केली.