शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
3
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
4
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
5
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
6
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

गार्डन्स क्लब हा कोल्हापूरचा हरितदूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 4:13 AM

कोल्हापूर : गार्डन्स क्लबने कोल्हापूरला झाडे लावण्याची, वाढविण्याची आणि जपण्याची सवय लावली. हा क्लब कोल्हापूरला हरितदूत आहे, असे प्रशंसोद्गार ...

कोल्हापूर : गार्डन्स क्लबने कोल्हापूरला झाडे लावण्याची, वाढविण्याची आणि जपण्याची सवय लावली. हा क्लब कोल्हापूरला हरितदूत आहे, असे प्रशंसोद्गार दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय डी. सावंत यांनी काढले.

येथील गार्डन्स क्लबच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त रविवारी येथील कृषी महाविद्यालयात आयोजित एकदिवसीय पुष्परचना स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

सावंत म्हणाले, प्लास्टिक गुंडाळलेला पुष्पगुच्छ देण्यापेक्षा कधीही रोप देणे उत्तम असते. परदेशी फुलांपेक्षा भारतीय दुर्मीळ फुले ही अधिक आकर्षक मोहक व उपयुक्त आहेत. या सगळ्यांबाबत जनजागृती करण्याची भूमिका क्लबने पार पाडली आहे.

ज्येष्ठ सदस्य रवींद्र ओबेराय म्हणाले, १९६९ साली स्थापन झालेल्या या गार्डन्स क्लबने वृक्ष, झाडे, रोपे, फुले यांचे सतत संवर्धन व जतन केले आहे. हरितसेना तयार करण्यासाठी प्रयत्न केले. कोल्हापूर बोनसाय क्लबची स्थापना केली. क्लबच्या अध्यक्ष कल्पना सावंत म्हणाल्या, जयपूरमधील फ्लॉवर शो मध्ये सहभाग नोंदविलेल्या गार्डन क्लबला २०१६ साली वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आंतरराष्ट्रीय पातळीवरही नाव उंचावण्याचा प्रयत्न करू.

यावेळी रोजेट अंकाचे प्रकाशन करण्यात आले. माजी अध्यक्ष डॉ. धनश्री पाटील यांच्या स्टडीज इन एक्स्प्लोरेशन ऑफ बाय पेस्टीसिडीअल पोटेन्शियल ऑफ सम प्लांट या संशोधनाचे प्रकाशन करण्यात आले. स्थापनेपासूनच्या ज्येष्ठ सदस्यांचा सत्कार करतानाच हरित समृद्धी पुरस्काराने ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी डॉ. मैथिली नाईक यांची ‘वृक्षायुर्वेद’ प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथमधील वनस्पती संगोपन या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली. कृषी महाविद्यालयाचे विभागप्रमुख डॉ. श्रीराम अंबड, उपाध्यक्ष शशिकांत कदम, सचिव पल्लवी कुलकर्णी, खजानीस राज अथणे, इंदुताई सावंत, जयश्री कजारीया, रवींद्र साळुंखे, संगीता कोकितकर, रोहिणी पाटील, सुभाषचंद्र अथणे, विलास बकरे, डॉ. दिलीप शहा, शशिकांत जोशी, संगीता सावर्डेकर, वर्षा वायचळ यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते.

चौकट

संजय घोडावत ग्रुप मानकरी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुष्प स्पर्धा ऑनलाईन घेण्यात आल्या. यामध्ये गुलाब, एकच जातीचे गुलाब, बटण गुलाब, बटण गुच्छ, विविध फुले, पुष्परचना, कुंड्यातील रोपे, बोन्साय, ट्रेलँडस्कोप व टेरारीयम, बुके स्पर्धा, गार्डन ऑफ द इयर, सॅलेड डेकोरेशन हँगिंग बास्केट आणि मुक्तरचना या विविध गटांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. ‘क्वीन ऑफ द शो’ आणि ‘किंग ऑफ द शो’ हे संजय घोडावत ग्रुपने पटकाविले.

चौकट

डोळे सुखावणारी फुले

विविध जातीची टपोरी फुले पाहून उपस्थितांचे डोळे सुखावल्याचे चित्र यावेळी पाहायावस मिळाले. रंगीबेरंगी फुले, परिश्रमातून साकालेल्या पुष्परंगावली, पुष्परचना याचा उत्कट अनुभव उपस्थितांनी घेतला.

२७१२२०२० कोल गार्डन्स क्लब ०१

कोल्हापूर येथील गार्डन्स क्लबच्या सुवर्णमहोत्सवी प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. यावेळी डावीकडून पल्लवी कुलकर्णी, अरुण नरके, रविंदर उबेरॉय, कल्पना सावंत, इंदुताई सावंत, डॉ. श्रीराम अंबड, राज अथणे, शशिकांत कदम उपस्थित होते.

२७१२२०२० कोल ०२/०३/०४/०५

चार गटांमध्ये पहिला क्रमांक पटकाविणारी संजय घाेडावत ग्रुपची ही गुलाबफुले.