शहरं
Join us  
Trending Stories
1
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
2
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
3
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
4
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
5
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट; दोघांमध्ये दोन तास चर्चा 
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; आज तारखा होणार जाहीर
7
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी मर्डर केस : गोळीबारात जखमी झालेल्या टेलरने सांगितलं ५ मिनिटांत काय घडलं?
8
बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमानला अतिरिक्त सुरक्षा; शुटिंगचे ठिकाण, फार्महाऊसवर नजर
9
लोणकर बंधूंकडून शूटर्सला पैशांचा पुरवठा, शस्त्रही दिले; पुण्याच्या डेअरीत बसून केले प्लॅनिंग
10
बाबा सिद्दिकी वांद्र्यातील रिअल इस्टेट किंग कसे बनले? असा सुरू झाला होता प्रवास
11
मी अल्पवयीन म्हणणारा निघाला २१ वर्षांचा! न्यायाधीशांच्या घरी भरले कोर्ट 
12
Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; निकालानंतर Reliance Industries मध्ये घसरण
13
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
14
बिश्नोई गँगवरुन कॅनडा पोलिसांचे गंभीर आरोप; म्हणाले, "भारताचे गुप्तहेर..."
15
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
16
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
17
महायुतीच्या 7 जणांना आमदारकीचे गिफ्ट; भाजपला 3, तर शिंदेसेना आणि अजित पवार गटाला प्रत्येकी 2 जागा
18
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
19
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक

गस्त नाय ! मग घर लुटू द्यायचं काय?

By admin | Published: August 19, 2015 12:16 AM

ग्रामस्थांचा पोलिसांना सवाल : प्रत्येक गावात रात्रभर पेट्रोलिंग करा; आम्ही निवांत झोपतो

कोल्हापूर : करवीर, पन्हाळा तालुक्यांत चोरांचा सुळसुळाट असल्याने सर्व गावे भयभीत झाली आहेत. चोऱ्या रोखण्यासाठी रात्रभर गस्त घालताना हुल्लडबाजी झाल्यास थेट गुन्हे दाखल करण्याची ‘तंबी’ पोलिसांनी दिली आहे. गस्त घालायची नाही तर आमची घरं लुटू द्यायची काय? असा थेट सवाल ग्रामस्थ करीत आहेत. ही कारवाई म्हणजे ‘चोर सोडून संन्याशाला फाशी’ देण्यातील प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. गेले महिना-दीड महिना कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. चोरट्यांच्या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. ग्रामस्थ आपल्यापरीने स्वत:चे संरक्षण करत आहे. ज्यांची घरे शेताच्या जवळ आहेत तिथे तर प्रचंड घबराट आहे. असे असताना पोलीस यंत्रणा मात्र गप्पच आहे. चोरटे नाहीत, केवळ अफवा असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, पण प्रत्यक्षदर्शी व्यक्ती चोरांचे वर्णन सांगत आहेत. वास्तविक चोरीमुळे घबराट पसरली असताना पोलिसांनी रात्रीचे पेट्रोलिंग करून दिलासा देणे अपेक्षित होते. पोलिसांकडून हे होत नसल्याने नागरिक स्वत: गस्त घालत आहेत पण गस्त घालणाऱ्या नागरिकांनाच कारवाईची ‘तंबी’ पोलिसांनी केल्याने पोलिसांच्या भूमिकेबद्दल कमालीचा संताप व्यक्त होत आहे. दिवसभर शेतात, रात्री गस्तसध्या पावसाची उघडझाप सुरू असल्याने तणांना पोषक वातावरण आहे. त्यामुळे शेतकरी खरीप पिकांची भांगलण करून मेटाकुटीला आलेले आहेत. दिवसभर भांगलण करायची आणि रात्री चोरांच्या भीतीने गस्त घालावी लागत असल्याने नागरिक वैतागले आहेत. पोलीस चौक्या शोभेलाचगावागावांत चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने नागरिक हैराण असताना पोलीस यंत्रणा मात्र फारशी जागरूक दिसत नाही. पोलीस चौक्यांमध्ये एकही पोलीस कर्मचारी नाही, पोलीस चौक्या म्हणजे शोभेसाठीच दिसत असल्याची प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.चोऱ्यांच्या घटनांचा फ ायदा घेत काहीजण पूर्ववैमनस्यातून जाणीवपूर्वक लोकांना त्रास देण्यासाठी घरांवर दगडफेक करीत आहेत. अशा घटनांमुळे भटक्या विमुक्त बांधवांना पोलीस आणि समाजाकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कारण नसताना भटक्या विमुक्तांना त्रास दिल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील.-प्रा. शहाजी कांबळे, प.महाराष्ट्र अध्यक्ष,रिपब्लिकन पक्ष (गवई गट) ‘चोर नाहीच’ म्हणणे हे हास्यास्पद आहे. नागरिक विनाकारण रात्र-रात्रभर जागे कशाला राहतील. पोलिसांनी रात्रीचे पेट्रोलिंग करून विश्वास देणे अपेक्षित होते, पण तसे न करता नागरिकांवरच गुन्हे दाखल करण्याची भाषा अनाकलनीय आहे. - शशिकांत म्हेत्तर (सरपंच, सांगरूळ) गावामध्ये गस्तीदरम्यान संशयित आढळल्यास त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करा. कायदा हातात घेऊ नका. संशयितांना मारहाण केल्यास संबंधितांवर कारवाई होईल. - डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा पोलीसप्रमुख