लॉकडाऊन करण्यात आला आहे.
गावात वाढलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या
पार्श्वभूमीवर ९ मेपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ करण्यात आला आहे. गावातील सर्व व्यापारी ट्रान्स्पोर्ट, दुकाने, हॉटेल, संस्थांनी व्यवहार बंद ठेवून यात सहभाग नोंदविला. प्रत्येक प्रभागात टास्क फोर्स कमिटी स्थापन केली आहे. या कमिटीने आपापल्या वॉर्डात गस्त घालून जनता कर्फ्यूची अंमलबजावणी केली आहे. सर्व नागरिकांनी या निर्णयाचा अवलंब करावा व गाव कोरोनामुक्त करूया, असे आवाहन सरपंच शशिकांत खवरे यांनी केले आहे. या टास्क फोर्समध्ये उपसरपंच सुरेश यादव, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव पाटील, विनायक कुंभार, ज्योतिराम पोर्लेकर, प्रकाश कौंदाडे, सरदार मुल्ला, संग्राम कदम, सलीम महात, अविनाश कोळी, लियाकत गोलंदाज, रणजित केळुसकर, मन्सूर नदाफ यांचा समावेश आहे.
फोटो : ०७ शिरोली बंद
ओळी :
शिरोलीत कडकडीत बंद पाळण्यात आला असून, गावात विनाकारण संचार करणाऱ्यांची चौकशी टास्क फोर्सच्या सदस्यांकडून केली जात आहे. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, ज्योतिराम पोर्लेकर उपस्थित होते.