चंदगड : नवीन तंत्रज्ञानामुळे गंथालय क्षेत्रात बदल होत आहेत. गं्रथपालांनी या बदलांना सामोरे जाण्याची तयारी ठेवल्यास वाचकांना अधिक चांगले लाभ मिळतील, असे मत खेडूत शिक्षण मंडळाचे सांचलक व जनसंपर्क अधिकारी प्रा. पी. सी. पाटील यांनी व्यक्त केले.र. भा. माडखोलकर महाविद्यालयात ‘गं्रथालय व्यवस्थापनाची नवी साधने’ याविषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी र. भा. माडखोलकर होते. कार्यशाळेत प्रा.डॉ. जी. ए. बुवा, प्रल्हाद जाधव, डॉ. ए. एन. इनामदार, प्रा. डॉ. एन. आय. दिवटणकर यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. पी. आर. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. एस. डी. गोरल यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रा. आर. एस. गडकरी यांनी आभार मानले. व्ही. आर. बांदिवडेकर, एल. डी. कांबळे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
गंथपालांनी बदलांना सामोरे जावे
By admin | Published: April 15, 2015 9:10 PM