एकनाथ पाटील ।कोल्हापूर : यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे साऊंड सिस्टीम लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
गणेशोत्सव अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. गेल्या पाच वर्षांपासून ‘साऊंड सिस्टीममुक्त गणेशोत्सव’ साजरा केला जात आहे. गणेशोत्सवानंतर जिल्ह्यात होणाºया सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांमध्ये साऊंड सिस्टीमवर निर्बंध घालण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव साऊंड सिस्टीममुक्त करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, जिल्ह्यात साऊंड सिस्टीममुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न केले जात आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यांच्या निरीक्षकांना सार्वजनिक मंडळांच्या प्रबोधनावर भर देण्याबरोबरच मंडळांना कायदेशीर नोटिसा पाठवून साऊंड सिस्टीमपासून रोखण्यासाठी प्रयत्न करा, असे आदेश दिले आहेत.
मी स्वत: प्रत्येक पोलीस ठाण्यास भेट देऊन हद्दीतील मंडळांच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. पोलीस प्रशासनाने २०११ मध्ये गणेशोत्सव साऊंड सिस्टीममुक्त करण्यासाठी पावले उचलली. यंदाही कोल्हापूर, इचलकरंजीसह उपनगरातील (पान ३ वर)सिस्टीमच्या दृश्य परिणामांबाबत प्रबोधनकायद्याच्या पलीकडे जाऊन ध्वनिक्षेपक यंत्रणेचा वापर केल्यास मानवी शरीरावर त्याचे गंभीर परिणाम होतात. त्यामध्ये वृद्ध नागरिक, लहान बालके, गर्भवती स्त्रिया, मानवी श्रवण यंत्रणा, रक्तदाब, हृदयरोग, अर्धांगवायू असे आजार होण्याचे वैद्यकीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे; त्यामुळे यंदाही साऊंड सिस्टीमविरहित गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन सर्व मंडळांना पोलीस दलाच्या वतीने केले जात आहे. सोशल मीडियाद्वारेही त्याचे प्रबोधन केले जात आहे.