तानाजी पोवार ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : मतदानाला दोनच आठवडे शिल्लक राहिले असताना आरोप-प्रत्यारोपाने प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. प्रचारसभा, मेळावे, बैठका, पदयात्रा, कोपरा सभा यांच्यासह वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर उमेदवारांचा पहिल्या टप्प्यात भर राहिल्याचे चित्र दिसत आहे.कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात आघाडीच्या चारही उमेदवारांकडून मतदारसंघातील शहरी भागासह दुर्गम भागात पोहोचून मतदारांना आपलेसे करण्याची किमया दाखविली जात आहे. नेते व कार्यकर्ते व्यक्तिगत पातळीवर कुरघोड्या करत मतदारांची फोडाफोडी, नाराजांना ‘खूष’ करत सत्तेची गणिते जमविण्यात मश्गुल असल्याचेही दिसत आहेत. दोन्हीही मतदारसंघांतील प्रमुख चारही उमेदवारांनी प्रत्येक गावातजास्तीत-जास्त कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न सुरूठेवले आहेत. उमेदवारांच्या प्र्रचाराची पहिली फेरी पूर्ण झाली असून, दुसऱ्या फेरीलाही प्रारंभ केला आहे.कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात राष्टÑवादी-राष्टÑीय काँग्रेस आणि मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार खासदार धनंजय महाडिक व सेना-भाजप-मित्रपक्ष युतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यात प्रामुख्याने लढत असल्याचे चित्र दिसत आहे. ‘हातकणंगले’त स्वाभिमानी-काँग्रेस-राष्टÑवादीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी आणि शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यात खरी चुरस दिसून येत आहे.
गावभेटी, सभांची पहिली फेरी पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 12:22 AM