शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
4
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
5
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
8
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
9
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
10
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
11
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
12
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
13
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
14
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
15
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
16
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
17
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
18
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
19
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल

गवारी, ओला वाटाणा कडाडला, बहुतांशी भाज्या ८० रुपयांच्या पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 4:46 PM

लॉकडाऊननंतरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांनी चांगलीच उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात गवारी व ओला वाटाणा कडाडला असून, बहुतांश भाज्या ८० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. साखर, सरकी तेलासह कडधान्य मार्केट मात्र अद्याप शांतच दिसत आहे.

ठळक मुद्देगवारी, ओला वाटाणा कडाडला, बहुतांशी भाज्या ८० रुपयांच्या पुढे कडधान्य मार्केट मात्र शांत

कोल्हापूर : लॉकडाऊननंतरच्या पहिल्या आठवड्यात भाज्यांनी चांगलीच उसळी घेतली आहे. किरकोळ बाजारात गवारी व ओला वाटाणा कडाडला असून, बहुतांश भाज्या ८० रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. साखर, सरकी तेलासह कडधान्य मार्केट मात्र अद्याप शांतच दिसत आहे.श्रावण सुरू झाल्यापासून भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे दर तेजीत आहेतच; मात्र या आठवड्यात भाज्या जरा जास्त कडाडल्या आहेत. किरकोळ बाजारात गवारी १२० रुपये, तर ओला वाटाणा १६० रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे.

आज, श्रावणातील दुसरा सोमवार असल्याने रविवारी भाज्यांच्या मागणीत मोठी वाढ झाली. पावसाने उघडीप दिल्याने, भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने घाऊक बाजारात पुरेसा माल उपलब्ध आहे. मात्र मागणी वाढल्याने मालाला तेजी आली आहे. किरकोळ बाजारात तर बहुतांश भाज्यांचे दर ८० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. सर्वांत कमी ४० रुपये किलो फक्त टोमॅटो आहे.श्रावण महिना हा सणासुदीचा असला तरी ग्रामीण भागात लोकांच्या हातात पैसे नाहीत. त्यामुळे कडधान्य मार्केटमध्ये काहीशी शांतता दिसते. किरकोळ बाजारात साखर ३७ रुपये तर सरकी तेल १०० रुपये किलो आहे. श्रावणात उपवासासाठी लागणारी शाबूचे दरही यंदा ७० रुपयांवर स्थिर राहिले आहेत.

शेंगदाणा १०० रुपये तर तूरडाळ १०० व हरभराडाळ ६० रुपये किलोपर्यंत आहे. आवक चांगली असली तरी त्या पटीत मालाचा उठाव होत नाही. फळबाजारामध्ये सध्या सफरचंद, सीताफळ, डाळींब, माल्टा, केळींची रेलचेल दिसते. सफरचंद १०० पासून २५० रुपये किलोपर्यंत आहेत. केळीची मागणी अधिक असल्याने ४० रुपये डझन दर राहिला आहे.कांदा घसरला!घाऊक बाजारात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात १० पासून १५ रुपयांपर्यंत चांगला कांदा मिळत आहे. बटाट्याचा दरही २० ते २५ रुपयांवर स्थिर आहे.किरकोळ बाजारात भाज्यांचे दर प्रतिकिलो असे -वांगी (८०), टोमॅटो (४०), ओली मिरची (८०), ढबू (८०), घेवडा (८०), गवार (१२०), ओला वाटाणा (१६०), कारली (६०), भेंडी ( ६०), वरणा (८०), दोडका (६०), कांदा (१२), बटाटा (२०), साखर (३७), तूरडाळ (१००), हरभराडाळ (६०), मूगडाळ (१२०), मूग (१००), मटकी (१२०), शाबू (७०), शेंगदाणे ( १००), सरकी तेल (१००), मेथी ( २० पेढी), कोथिंबीर (२०). 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारkolhapurकोल्हापूर