पोर्ले तर्फ ठाणे : येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गीता तानाजी चौगुले यांची, तर उपसरपंचपदी अरुण बापूसाो पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विस्तार अधिकारी पी. डी. भोसले यांनी काम पाहिले. सरपंच, उपसरपंच निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला.
मसाईदेवी महाविकास आघाडीने १३ सदस्य निवडून आणल्याने ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. सरपंचपद खुले आरक्षित असले तरी, १३ सदस्यांपैकी सहा महिलांना सरपंच पदाची समान संधी देऊन आघाडीने वेगळा आदर्श घालून दिला आहे.
याप्रसंगी आघाडीचे नेते परशराम खुडे, एम. पी. चौगुले, अंगद शेवाळे, नंदकुमार गुरव, राऊ काशीद, संजय चावरेकर, सागर चेचर, नूतन ग्रामपंचायत सदस्य सागर चेचर, जीवन खवरे, रजनी गुरव, संभाजी जमदाडे, शहाजी खुडे, वनीता भोपळे, एम. एम. पाटील, नम्रता घाटगे, अनुराधा पाटील, सचिन चोपडे, छाया कांबळे, अश्विन काशीद, संगीता बुचडे, अश्विनी संकपाळ, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार पाटील, तलाठी गगन देशमुख, पोलीसपाटील पंडित वाघमारे आदींसह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.
२५ गीता पाटील