शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

बंदच्या हाकेला सामान्यांचा प्रतिसाद

By admin | Published: June 06, 2017 12:40 AM

शेतकऱ्यांचे आंदोलन : रास्ता रोकोसह सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा; वाहतूक ठप्प

कोल्हापूर : स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, कर्जमाफी, पीक हमी यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या बंदच्या हाकेला सर्व व्यवहार बंद ठेवत सामान्यांनी प्रतिसाद दिला. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांत रास्ता रोकोसह शासनाच्या निषेधाच्या घोषणा देत शेतकरी रस्त्यावर आले. बंदमुळे कागलच्या आठवडी बाजारात शुकशुकाट होता. काहींनी भाजी विक्रीचा प्रयत्न केल्यावर आंदोलकांनी त्यांना रोखले. बंदमुळे अनेक गावांतील वाहतुकीची व्यवस्था कोलमडली. मात्र, बंद नियोजित असल्यामुळे प्रवाशांना त्याचा फारसा त्रास झाला नाही. कागलमध्ये आठवडी बाजार बंदकागल : शेतकरी संपास पाठिंबा दर्शविण्यासाठी सोमवारी पुकारण्यात आलेल्या कागल बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी रस्त्यावर उतरले होते. शहरातून मुख्य रस्त्याने चालत गैबी चौकात आल्यानंतर टोमॅटो रस्त्यावर ओतण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतीकात्मक पुतळाही जाळण्यात आला. बंदमुळे आजचा आठवडा बाजार बंद होता. सोमवारच्या बंदची कल्पना नसलेले काही व्यापारी बाजरपेठेत माल घेऊन आले होते. हा जमाव पाहून ते घाबरले होते. मात्र, कोणता अनुचित प्रकार घडला नाही. शहरातील सर्व व्यवहार बंद होते. काही राष्ट्रीयीकृत बँका सुरू होत्या. तेथे कार्यकर्ते घोषणाबाजी करीत गेले. गैबी चौकात आल्यानंतर तेथे बोलताना जिल्हा बँकेचे संचालक भैया माने म्हणाले, की महाराष्ट्रात जवळपास पाचशे ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पुतळा जाळण्यात आला आहे. तरीही हे सरकार शेतकरी प्रश्नांवर अजून अभ्यासच करीत आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी भाजप सरकार आहे. सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलनाची धार अधिकच तीव्र करावी लागणार आहे. माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर म्हणाले की, निवडणुकीपूर्वी सवंग लोकप्रिय घोषणा करून जनतेला फसविण्याचे काम भाजपने केले आहे. आता या घोषणांची पूर्तता करणे टाळत आहेत. शेतकरी संघटनेचे शहराध्यक्ष सागर कोंडेकर म्हणाले, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करावी, या मागणीसह विविध मागण्या पूर्ण करणार म्हणून खासदार राजू शेट्टी यांनी या सरकारला पाठिंबा दिला होता. पण, त्यांनी शेतकऱ्यांना फसविल्याने संघटना रस्त्यावर उतरली आहे. यावेळी उपनगराध्यक्ष नितीन दिंडे, पक्षप्रतोद प्रवीण काळबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, सदाशिव पिष्टे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.नदी किनाऱ्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोकोसिद्धनेर्ली : सिद्धनेर्ली, नदी किनारा, येथे रास्ता रोको करून भाजप सरकारचा निषेध करण्यात आला. सकाळी ९.३० वाजता सुरू झालेल्या संपामध्ये सिद्धनेर्ली, एकोंडी, बामणी, व्हन्नूर, नदीकिनारा, शेंडूर, आदी गावांतील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. दत्तात्रय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी लाल बावटा बांधकाम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष कॉ. शिवाजी मगदूम म्हणाले की, भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या आणि दीनदलितांच्या विरोधातील सरकार आहे. शेतकऱ्यांचा संप सुरू असताना त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करून त्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. भांडवलदारांची कोटीची कर्जे माफ करून त्यांनी स्वत:चा खिसा भरण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सदाभाऊ खोत, सयाजी सूर्यवंशी यांनी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला, पण अजित नवले यांनी तो मोडून काढला व शेतकऱ्यांचा संप सुरूच ठेवला. त्याबद्दल आंदोलनस्थळी त्यांचा अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. याप्रसंगी केशव चौगले, रामदास बराळ, कृष्णात मेटील, सुदर्शनी बल्लाळ, दादासो पाटील, रणजित महाडिक, नेताजी बुवा, नामदेव कुन्नुरे, आरीश पाटील, राहुल मगदूम, किरण मगदूम, आदी शेतकरी व नागरिक उपस्थित होते.म्हाकवे परिसरात कडकडीतम्हाकवे : म्हाकवेसह गोरंबे, केनवडे, बस्तवडे, आणूर, बानगे, हमीदवाडा, कौलगे परिसरात कडकडीत बंद पाळून ग्रामस्थांनी ‘महाराष्ट्र बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी व्यावसायिकांसह लहान-सहान पान टपऱ्याही बंद ठेवण्यात आल्या होत्या. कागल-निढोरी या आंतरराज्य मार्गावर केनवडे फाटा येथे तसेच आणूर-बस्तवडे दरम्यान रास्ता रोको करण्यात आला. यामुळे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांच्या मदतीने ही वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली. या रास्ता रोकोमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, डाव्या चळवळीतील कार्यकर्त्यांसह शेतकरी तरुण सहभागी झाले होते. यावेळी ‘कर्जमाफी मिळाली पाहिजे’, ‘शासनाचा धिक्कार असो’, अशा घोषणांनी परिसर दणाणला.कडगाव परिसरात बंदला प्रतिसादकडगाव : शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे, कर्जमाफीस विरोध करणाऱ्या शासनाचा निषेध नोंदवीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व संप मोडण्याचा प्रयत्न केल्याच्या निषेधार्थ कडगाव (ता. भुदरगड) येथे सदाभाऊ खोत यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटना तालुका अध्यक्ष बाजीराव देसाई, सुरेश मांगले, जयराम कांबळे, काशिनाथ देसाई, सुभाष सोनार, एम. डी. देसाई, असिम काझी, आरिफ काझी, वसंत पाटील, पप्पू डिसोझा, आदी उपस्थित होते.करवीर तालुका पश्चिम भागात १०० टक्के उस्फूर्तपणे बंदसावरवाडी : सकाळी दहा वाजल्यापासून करवीर तालुक्यात दूध संस्था, विकास सेवा संस्था, पाणीपुरवठा संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. दिवसभर गावागावांत दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. दूध संस्थांनी दूध संकलन सकाळी व सायंकाळी बंद करून शेतकरी संपाला पाठिंबा दिला. ग्रामीण भागातील बाजारपेठा, व्यापारी दुकाने, सहकारी संस्थांची कार्यालये, भाजीपाला मार्केट बंद ठेवण्यात आली होती. तालुक्यात कसबा बीड, बीडशेड, गणेशवाडी, कोगे, महे, आरे, शिरोली दुमाला, सावरवाडी, धोंडेवाडी, बहिरेश्वर, म्हारूळ, बाचणी, भाटणवाडी, हिरवडे दुमाला, सडोली दुमाला, पाडळी खुर्द, सावर्डे दुमाला, आदी गावांच्या परिसरात बंद आंदोलन उस्फूर्तपणे करण्यात आले. कोल्हापूर शहराकडे जाणारा भाजीपाला शेतकऱ्यांनी पाठविलेला नाही. दूध संस्थेचे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमध्ये कॉँग्रेस (आय), राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना, महाराष्ट्र राज्य किसान सभा, शेतकरी कामगार पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, शिवसेना, आर.पी.आय. आदी पक्ष व संघटनेचे कार्यकर्ते सहभागी होते. बंदला मेडिकल दुकाने, दवाखाने, एस.टी., के.एम.टी. वाहतूक सेवा वगळण्यात आली. बंद शांततेत पार पडला.सरवडे, मुदाळतिट्टा, बिद्री परिसरात कडकडीत बंदसरवडे : शेतकरी संपातील बंदच्या हाकेला सरवडे, मुदाळतिट्टा, बिद्री परिसरातील उद्योग, व्यवसाय, संस्था, दुकाने बंद ठेवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात आल्या होत्या. सकाळी सहापासून रात्रीपर्यंत सर्व व्यवहार ठप्प झाले होते. बंदला सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सरवडे येथे व्यापारी असोसिएशन व दूध संस्था कर्मचारी यांनी बंदला पाठिंबा दर्शवत गावातून फेरी काढली. शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या शासनाने मान्य कराव्यात, अशा घोषणा दिल्या. यावेळी कुंडल पाटील, पांडुरंग खोत, प्रशांत पाटील, गणपती आरडे, सचिन वागवेकर, जयदीप कोतमिरे यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.सांगरूळ परिसरात दूध संस्था, बाजारपेठा, भाजीपाला विक्री बंदसांगरूळ : करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी गावागावांतील सर्व दूध संस्था, बाजारपेठा, भाजीपाला विक्री व्यवहार बंद ठेवून १०० टक्के पाठिंबा देत कडकडीत बंद पाळण्यात आला. ग्रामीण भागात दूध संस्था, इतर सर्व व्यवहार पूर्णपणे बंद असल्यामुळे सगळीकडे शुकशुकाट जाणवत होता. गावागावांतील सर्व दूध संस्थांचे दूध संकलन बंद केल्यामुळे त्यातच रात्री गोकुळ दूध संघाने दूध संकलन न करता संपाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्रामीण भागात नेहमी सकाळी दूध काढणे, डेअरीत संकलन करण्याची जाणवणारी लगबग थंडावली होती. तसेच कोल्हापूरला येणाऱ्या खासगी वडापचालकांनीही वाहतूक बंद ठेवून संपाला पाठिंबा दिल्यामुळे वर्दळ कमी जाणवत होती. सांगरूळ गावातील दुकानदार, व्यापारी यांनी दुकाने बंद ठेवून शेतकरी संपात सहभाग घेतला.पांगिरे परिसरात बंदपांगिरे : चिकोत्रा खोऱ्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. सोमवारी सकाळी ‘गोकुळ’चे दूध संकलन बंद असल्याने गावातील दूध संस्थांनी दूध संकलन बंद केले. येथील शेतकरी संपात सहभागी झाले. ग्रामीण भागातील पिंपळगाव, पांगिरे, दिंडेवाडी, बामणे, मुरुक्टे, बारवे, पाल अशा अनेक गावांत दुकाने पूर्णपणे बंद होती. बंदचे आवाहन प्रत्येक गावातील शिवसैनिक व शेतकरी करीत होते. गावागावांत सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. बंदमुळे ग्रामीण भागात शुकशुकाट होता.