कोल्हापूर : हातात गिअर अन् पायात क्लच असलेली ‘नॉरटन’, दुसऱ्या जागतिक महायुद्धातील ट्रायम्प कंपनीची ‘थ्रीएचडब्ल्यू’, अशा दुचाकी आणि महायुद्धात वापरलेल्या फोल्डेबल सायकली पाहून रविवारी कोल्हापूरकर थक्क झाले. निमित्त होते... बायकर्स आॅफ इंडिया-कोल्हापूर आणि डीवायपी सिटीतर्फे आयोजित ‘द विंटाज बाईक शो अँड शाईन २०१५’ या प्रदर्शनाचे. पावसातही हे प्रदर्शन पाहण्यास शहरवासीयांची गर्दी होती.येथील डीवायपी सिटीच्या प्रवेशद्वारात दुपारी चार वाजता या प्रदर्शनाचा प्रारंभ झाला. भारतीय आणि परदेशी बनावटीच्या दुर्मीळ दुचाकी कोल्हापूरकरांना पाहण्यास मिळाव्यात, या उद्देशाने आयोजित प्रदर्शनात ट्रायम्प, बीएसए, नॉरटन, लॅम्रेडा, राजदूत, रॉयल एनफिल्ड, सुवेगा, लक्ष्मी, आदी कंपन्यांच्या ३७ दुचाकी ठेवण्यात आल्या होत्या. यातील १९४२ मध्ये सैन्यदलात वापरलेली ‘थ्रीएचडब्ल्यू’, १९३८ मध्ये युद्धात शस्त्रास्त्रे घेऊन जाण्यासाठी वापरण्यात आलेली बीएसए कंपनीची ‘एम २०’, पायात क्लच आणि हातात गिअर असणारी १९३२ मधील ‘नॉरटन’, एनफिल्डची २५० सीसीची ‘क्लिपर’ आणि एनफिल्ड क्रुसेडर ही २०० सीसीची दुचाकी, तसेच जागतिक महायुद्धात वापरलेल्या बीएसएच्या दोन फोल्डेबल सायकली पाहून अनेकजण भारावून गेले. या दुर्मीळ दुचाकींसमवेत अनेक दुचाकीप्रेमींना ‘सेल्फी’ काढण्याचा मोह आवरता आला नाही. या प्रदर्शनाचे संयोजन ऋषिराज जमादार, प्रथमेश कल्याणकर, विशाल बोभाटे, नीलेश पाटील, आदींनी केले. (प्रतिनिधी)रशियन ‘उराल’ दुचाकीने लक्ष वेधलेस्वित्झर्लंडचे डॅनियल व नादिया हे दाम्पत्य ‘उराल’ या दुचाकीवरून भारतभ्रमण करीत आहेत. ते जूनमध्ये स्वित्झर्लंडमधून निघाले आहेत.रविवारी ते कोल्हापुरात आले असता त्यांनी ‘डीवायपी सिटी’तील या प्रदर्शनात सहभाग घेऊन आपली ‘उराल’ दुचाकी सादर केली.रशियन बनावटीची ७५० सीसी क्षमतेची आणि एक माणूस बसणारा व टूलकिट ठेवण्याची सुविधा असलेल्या या ‘उराल’ दुचाकीने अनेक दुचाकीप्रेमींचे खास लक्ष वेधून घेतले.
हातातील गिअरची ‘नॉरटन’, महायुद्धातील ‘थ्रीएचडब्ल्यू’
By admin | Published: October 05, 2015 12:35 AM