शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
3
ऐन निवडणुकीत पक्षाकडून निलंबन; सांगता सभेत शरद पवारांबद्दल काय म्हणाले राहुल जगताप?
4
"...तर उद्धव ठाकरे यांच्यावर FIR का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही?"; रामदास कदम यांचा सवाल
5
या सगळ्या अफवा! असित मोदींसोबतच्या भांडणावर जेठालालचं स्पष्टीकरण, म्हणाले- "मी हा शो सोडत नाहीये..."
6
कश्मिरा शाहचा अपघात नक्की कसा झाला? नणंद आरती सिंहने दिली माहिती; म्हणाली, "मॉलमध्ये..."
7
Mohammed Shami च्या फिटनेस टेस्टसाठी BCCI नं सेट केला नवा पेपर
8
'हे' ७ फॉर्म्युले डोक्यात फिट करा, कमाईसोबतच तुमचा पैसाही वाढेल; लोकही विचारतील, "हे कसं केलं?"
9
मोदी-ठाकरे-पवार-शिंदेंनी मैदान गाजवलं; सोलापुरात कुठे कोणत्या नेत्याच्या सभा झाल्या? जाणून घ्या
10
27000 सैनिक तैनात, अनेक जिल्ह्यात कर्फ्यू, इंटरनेट बंद; मणिपूरमध्ये नेमकं काय घडतंय?
11
भयानक! समुद्रकिनारी बसलेल्या माय-लेकी, अचानक लाट आली अन्...; थरकाप उडवणारा Video
12
विशेष मुलाखत: "संविधानाचे संरक्षण व्हावे यासाठीच आम्ही महायुतीसोबत"
13
Defence Stocks : HAL सह 'या' ३ स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, ९५ टक्क्यांपर्यंत देऊ शकतात रिटर्न
14
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
15
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
16
अनिल देशमुखांवरील हल्ला हे रचलेले कुंभाड; भाजपाचा संशय, आजच सखोल चौकशी करण्याची मागणी
17
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
18
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
19
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
20
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 

पश्चिमेची तटबंदी उतरुन घ्या

By admin | Published: February 14, 2015 12:01 AM

इंजिनिअर्स अ‍ॅन्ड आर्किटेक्ट असो.ची सूचना : रंकाळ्यासाठी ‘अल्सर पद्धतीची नवी भिंत बांधावी, निविदा काढणार

कोल्हापूर : रंकाळ्याच्या पश्चिम बाजूची ९० मीटरची तटबंदी कोणत्याही वेळी ढासळू शकते. ही संपूर्ण तटबंदी काढून कॉँक्रीटची भक्कम भिंत उभारणे व त्यापुढे जुन्या ‘अल्सर’ पद्धतीने उतरंडीसारखी दगडी भिंत उभारण्याचा पर्याय इंजिनिअर्स अ‍ॅन्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना सूचविला. नव्या व जुन्या तंत्रज्ञानानुसार होणाऱ्या या १ कोटी १० लाख रुपयांच्या कामासाठी अल्पकाळाची निविदा काढून तत्काळ काम सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.इंजिनिअर्स अ‍ॅन्ड आर्किटेक्ट असोसिएशनच्या सदस्यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यासह सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत पाहणी केली. यावेळी पश्चिम भागातील तटबंदी कोसळण्याची कारणे व पर्यायी तटबंदी कशा पद्धतीने उभी करावी, याचे सदस्यांनी अभ्यासपूर्ण सर्वेक्षण केले. रंकाळ्याच्या टॉवरखाली दलदल झाली असून, येथे तत्काळ क ॉँक्रिटचे मजबूतीकरण करण्याची गरज असल्याचे सदस्यांनी नमूद केले. अन्यथा टॉवर पडण्याचा धोका असल्याची सूचना केली. यापुढेही रंकाळा दुरुस्तीच्या कामात असोसिएशन वेळोवेळी सहकार्य करेल, असे आश्वासन असोसिएशनचे अध्यक्ष संदीप घाटगे यांनी दिले. यावेळी असो.चे सदस्य सुधीर राऊत, शिवाजी पाटील, मिलींद नाईक, मोहन वायचळ, रवी पाटील, उमेश कुंभार, सुनील मांजरेकर, सूरज जाधव, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)आयुक्तांच्या सूचनाआर्किटेक्ट असो.च्या सूचनांप्रमाणे रंकाळ्याची उर्वरित तटबंदी केव्हाही कोसळू शकते. तत्पूर्वी ही संपूर्ण तटबंदी हटवावी. झाडांच्या मुळांचा धोका भिंतीला होऊ नये, यासाठी भक्कम कॉँक्रिटची भिंत बांधावी.त्यापुढे जुन्या पध्दतीने दगडी भिंत उभारावी. ही भिंत धरणाच्या सांडव्याप्रमाणे उतरती असावी, या सर्व कामाची तत्काळ सुरुवात करण्यासाठी निविदा काढण्यात येईल, असे आयुक्तांनी आदेश दिले.