शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

संशोधनासाठी ‘केआयटी’चे प्राध्यापक, विद्यार्थ्यांना मिळणार साहाय्य

By admin | Published: July 04, 2017 6:39 PM

सांगलीच्या ‘समृद्धी फाउंडेशन’समवेत करार; कौशल्य विकासाचे प्रशिक्षण

आॅनलाईन लोकमतकोल्हापूर, दि. 0४ : येथील कोल्हापूर इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजीचे अभियांत्रिकी महाविद्यालय (केआयटी) आणि सांगलीतील समृद्धी टेक्नॉलॉजी बिझनेस इन्क्युबेशन (टीबीआय) फाउंडेशन यांच्यात मंगळवारी केआयटी येथे सामंजस्य करार झाला. या करारामुळे ‘केआयटी’मधील प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्या संशोधनासाठी तांत्रिक साहाय्य व आर्थिक निधी मिळणार आहे.या करारामुळे विद्यार्थ्यांच्या छोट्या संशोधनापासून ते प्राध्यापकांच्या कल्पक, मोठ्या संशोधनासाठी आर्थिक सल्ला व मदत, औद्योगिक व कायदेशीर सल्ला, संशोधन व विकास, विक्री-सेवा, आदींची उपलब्धता होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. पदवीनंतर विविध कंपन्यांमध्ये इंटर्नशिप करता येणार आहे. त्यासाठी ‘केआयटी’कडून आवश्यक असणारी जागा व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. या करारावेळी समृद्धी फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक ज्योती यादव, प्रतिनिधी नरेंद्र आंबी, ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी, संशोधन आणि विकास अधिष्ठाता डॉ. एस. एम. पिसे, राजेंद्र हेद्दूर उपस्थित होते.संशोधनाला पाठबळअभियांत्रिकी क्षेत्रात दिवसेंदिवस नवतंत्रज्ञानाची भर पडत आहे. प्राध्यापक, विद्यार्थ्यांच्या कल्पना व संशोधन बऱ्याच वेळा योग्य मार्गदर्शन, तांत्रिक साहाय्य व आर्थिक निधी, आदींमुळे अपुरे राहते. ‘केआयटी’चे प्राध्यापक, विद्यार्थ्यांची ही अडचण दूर करण्याच्या अनुषंगाने समृद्धी फाउंडेशनसमवेतचा करार महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी सांगितले. ते म्हणाले, या करारामुळे ‘केआयटी’मधील संशोधन परंपरेला पाठबळ मिळणार आहे. ‘केआयटी’चे अध्यक्ष सचिन मेनन, उपाध्यक्ष भरत पाटील, सचिव साजिद हुदली यांच्यासह संचालकांचे मार्गदर्शन लाभले.कोल्हापुुरात मंगळवारी केआयटी कॉलेज व सांगलीतील समृद्धी टेक्नॉलॉजी बिझनेस इनक्युबेशन फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार झाला. या कराराची प्रत समृद्धी फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक ज्योती यादव यांनी ‘केआयटी’चे संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांना दिली. यावेळी शेजारी डॉ. एस. एम. पिसे, राजेंद्र हेद्दूर, आदी उपस्थित होते.