शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

स्वत:च्या क्षमतांची ओळख करून घ्या...

By admin | Published: July 22, 2014 11:42 PM

वारणा वडगावकर : ‘सखीं’साठी व्यक्तिमत्त्व विकासाचा कानमंत्र

कोल्हापूर : ‘स्वत:च्या क्षमतांची ओळख करून घेत स्वत:मधील उणिवा शोधा,’ असे प्रतिपादन वारणा वडगावकर यांनी सखींना ‘ओळख माझी माझ्याशी’ या व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमात केले. लोकमत सखी मंचच्या वतीने कोरगावकर लॉन, टाकाळा येथे सोमवार, २१ जुलै रोजी व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमाचे दुपारी बारा ते तीन या वेळेत आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या. ‘स्वत:ला आहे तसे स्वीकारणे महत्त्वाचे आहे. जाणीवपूर्वक एक पाऊल रोज पुढे टाकले तर आपले ध्येय साध्य करता येते. रोज स्वत:साठी आणि इतरांसाठी एकच छोटी गोष्ट करा. आपल्या वेळेचे नीट नियोजन करा.’ अशा टिप्स देत वारणा वडगावकर यांनी सखींना हसत-खेळत व्यक्तिमत्त्व विकासाचा कानमंत्र दिला. कार्यक्रमासाठी गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेचे सहकार्य लाभले.सुरुवातीला ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन गोविंदराव कोरगावकर धर्मादाय संस्थेच्या संचालिका पल्लवी कोरगावकर, उद्योजिका संध्या कुंभारे आणि वारणा वडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. पल्लवी कोरगावकर यांनी सखींना स्वत:वर विश्वास ठेऊन प्रगती करण्याचा सल्ला दिला. संध्या कुंभारे यांनी महिलांनी चूल आणि मूल या जबाबदाऱ्यांचा बाऊ न करता ध्येय गाठण्याचा सल्ला दिला.सखी मंच संयोजिका प्रिया दंडगे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. यावेळी सखी मंच संयोजन समिती सदस्य राधिका कुलकर्णी, शोभा वोरा, दीप्ती सासने उपस्थित होत्या. यावेळी हॉटेल करवीर रियासत यांच्यावतीने उपस्थित सखींमधून लकी ड्रॉ श्रेयस तळपदे, नेहा जोशी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते काढण्यात आला. दोन विजेत्यांना हॉटेल करवीर रियासतकडून जेवणाचे कूपन देण्यात आले. (प्रतिनिधी)