लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणातील मुख्य सूत्रधार सांगलीचे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निलंबित पोलीस निरीक्षक विश्वनाथ ज्ञानदेव घनवट (वय ५३, रा. वडगाव शेरी, पुणे) व सहायक पोलीस निरीक्षक सूरज विष्णू चंदनशिवे (३६, रा. वासूद, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांच्याकडे कसून चौकशी सुरू आहे. दोघांचे मोबाईल कॉल डिटेक्शन तपासले असता ३८ कॉल संशयास्पद आहेत.संबंधितांना चौकशीसाठी बोलाविले आहे. या चोरी प्रकरणात कोल्हापूर कनेक्शन असल्याचेही तपासात पुढे आले आहे. परिस्थितिजन्य पुरावे गोळा करण्याचे काम सुरू असून, घनवट व चंदनशिवे तपासकामाला सहकार्य करीत नसल्याचे वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.विश्वनाथ घनवट, सहायक पोलीस निरीक्षक सूरज चंदनशिवे हे गुरुवारी (दि. ३) सीआयडी पोलिसांना शरण आले. शुक्रवारी (दि. ४) दोघांना पन्हाळा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या दोघांकडे दोन दिवसांपासून कसून चौकशी सुरू आहे. चोरीची रक्कम गुंतविली कुठे? या प्रश्नाचे उत्तर अद्याप तपास अधिकाºयांना मिळालेले नाही. दोघांचे मोबाईल कॉल डिटेक्शन तपासले असता चोरीच्या घटनेपासून गुन्हा दाखल होईपर्यंत काही व्यक्तींना वारंवार फोन झाले आहेत. सुमारे ३८ कॉल संशयास्पद असून, ज्यांच्याशी संपर्क झाला त्यांना चौकशीसाठी पोलिसांनी नोटीस पाठविली आहे. कोणत्या कारणासाठी हे कॉल झाले यासंबंधी विचारणा केली जाणार आहे.नातेवाइकांचे जबाब घेणारगुन्हा दाखल झाल्यापासून घनवट व चंदनशिवे पसार होते. त्यांचे मोबाईल पाच महिने बंद होते. घनवट हा अहमदनगर, पुणे, सोलापूर येथील नातेवाईक, मित्रांकडे वास्तव्यास होता. त्यांचेही जबाब घेतले जाणार आहेत.संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्याकडे चोरीचे पैसे आहेत, अशी टीप देणाºया खबºयांना या दोघांनी बक्षीस स्वरूपात पैसे दिले होते. त्यांचेही जबाब घेतले जाणार आहेत. सीआयडीचे पथक अन्य आरोपींच्या मागावर असून, लवकरच त्यांना अटक केली जाणार असल्याचे तपास अधिकाºयांनी सांगितले.चोरीदरम्यान दोन शासकीय व दोन खासगी वाहनांचा वापर केला होता. ती वाहने जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यावरील चालकांचे जबाब ‘सीआयडी’ने घेतले आहेत.
घनवट, चंदनशिवेंचे ३८ कॉल संशयास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2017 12:52 AM