शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

उद्योगपतींसाठीच ‘अमृत’ योजनेचा घाट : एन. डी. पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 1:01 AM

कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रस्तावित‘अमृत जलसिंचन योजना’ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नसून, त्यांच्या आडून उद्योगपतींना पाणी देण्याचा घाट असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. ‘माझ्या ७५ वर्षांच्या जीवनात मी जो निर्णय घेतला, तो विचारपूर्वक घेतला असून, कोणीपण येऊन मला बदनाम करायला ‘एन. डी.’ म्हणजे पालापाचोळा नव्हे!’ ...

कोल्हापूर : इचलकरंजी येथील प्रस्तावित‘अमृत जलसिंचन योजना’ नागरिकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नसून, त्यांच्या आडून उद्योगपतींना पाणी देण्याचा घाट असल्याचा आरोप ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केला. ‘माझ्या ७५ वर्षांच्या जीवनात मी जो निर्णय घेतला, तो विचारपूर्वक घेतला असून, कोणीपण येऊन मला बदनाम करायला ‘एन. डी.’ म्हणजे पालापाचोळा नव्हे!’ अशा शब्दांत प्रा. पाटील यांनी इचलकरंजीतील नेत्यांना सुनावले.इचलकरंजी येथील पाणी योजनेवरून वाद सुरू आहे, त्याबाबत रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत प्रा. पाटील यांनी आपली भूमिका अधोरेखित केली. प्रा. पाटील म्हणाले, इचलकरंजीतील नागरिकांना पिण्याचे पाणी देण्यास आमचा विरोध नाही. ही आपली सुरुवातीपासूनची भूमिका आहे; पण तेथील नेत्यांचा दानोळी डोहातूनच उपसा करण्याचा आग्रह आहे. यामध्ये आपणाला मखलाशी दिसत असून, जीवन प्राधिकरणाकडील नगरपालिकेच्या माहितीनुसार ८०० एच. पी.च्या पाच विद्युत पंपांनी चार फूट व्यासाच्या पाईपमधून ‘वारणा’ नदीतून पाणी उपसा करण्याचे नियोजन आहे. याद्वारे सारी वारणा नदीच उपसा करण्याचा डाव असून, ही लबाडी खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मुख्यमंत्र्यांनी याबाबत बैठक बोलावली आहे. त्यानंतर पाणी परिषदेचा निर्णय घेणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सागिंतले.इचलकरंजीतील काळ्या ओढ्याची चित्रफीत दाखवत आमदार उल्हास पाटील म्हणाले, ओढ्यात सोडलेले रसायनयुक्त पाणी थेट पंचगंगेत मिसळते. त्यामुळे शिरोळमधील १८ हजार लोकांना कॅन्सरने ग्रासले आहे. या मंडळींनीच वारणा उजव्या कालव्याला विरोध केला. तो झाला असता तर आज ही वेळ आलीच नसती. आमदार डॉ. सुजित मिणचेकर, विक्रांत पाटील, भगवान काटे, आदी उपस्थित होते.जुन्या योजनेत ‘ढपला’मजलेवाडी येथील जुन्या योजनेच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कोणाची होती ? जमिनीतून पाईप टाकणार तर ती कोणत्या दर्जाची असावी? याचा अभ्यास न करता केवळ ‘ढपला’ पाडण्याचे काम केल्याचा आरोपही प्रा. पाटील यांनी केला.‘वारणा’चे पाणीवाटप, टीएमसीएकूण क्षमता ३४पिण्यासाठी ९.५शेतीसाठी ८उद्योग १.२वाघुर्डी ७मृत साठा ७पाण्याची वाफ १.५मिशीतील जांभूळजांभळाच्या झाडाखाली झोपल्यानंतर एका व्यक्तीच्या मिशीवर जांभूळ पडते आणि ते तिथेच अडकते. त्याला वाटते, दुसऱ्या कुणीतरी येऊन ते मिशीतील जांभूळ आपल्या तोंडात घालावे, अशी स्थिती सध्या इचलकरंजीच्या नेत्यांची झाल्याची टीका प्रा. पाटील यांनी केली.शनिवारी रॅली‘वारणा’, ‘कृष्णा’ व ‘पंचगंगा’ काठांवरून शनिवारी (दि. २) सकाळी आठ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. तीन रॅली किणी येथे एकत्र येऊन ती वारणानगर येथे जाणार आहे.‘चिंगी’ महिन्याची आणि तिची ‘वरात!’नगरपालिकेने २०४९ ची लोकसंख्या गृहीत धरून पाणी योजना केली आहे. हे म्हणजे ‘चिंगी’ अजून महिन्याची झाली नाही तोपर्यंत तिच्या वरातीत बॅँड कोणता आणायचा, याची तयारी आहे, असे पालकमंत्र्यांना मुंबईतील बैठकीत म्हटलो, ते जरा त्यांना झोंबल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.