शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

भाजप सरकारकडून आरक्षणाला धक्का लावण्याचा घाट : कॉँग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2020 1:40 PM

केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेने मिळालेले ‘एससी,’ ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. हे चुकीचे असून, कॉँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.

ठळक मुद्देभाजप सरकारकडून आरक्षणाला धक्का लावण्याचा घाट : कॉँग्रेस

कोल्हापूर : केंद्रातील भाजप सरकारकडून राज्यघटनेने मिळालेले ‘एससी,’ ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याचा घाट घातला जात आहे. हे चुकीचे असून, कॉँग्रेस या विरोधात रस्त्यावर उतरेल, असा इशारा जिल्हा प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आला.शहराध्यक्ष प्रल्हाद चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अनंत गुरव यांना निवेदन सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, नुकत्याच घडलेल्या काही घटनांवरून येणाऱ्या काळात भाजप सरकार व संघपरिवार ‘एससी’, ‘एसटी’ व ‘ओबीसी’ आरक्षण रद्द करण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे.

भाजपप्रणित सरकारने वेळोवेळी न्यायालयात या आरक्षणाविरोधात भूमिका घेतली आहे. यामुळे मागास व उपेक्षित बहुजनांवर अन्याय होणार आहे. ही बाब भारतीय राज्यघटनेविरोधात असून ती अन्यायी आहे. जर आरक्षण रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला, तर याविरोधात कॉँग्रेस रस्त्यांवर उतरून आंदोलन करील.शिष्टमंडळात जिल्हा सचिव संजय पोवार-वाईकर, संपतराव चव्हाण-पाटील, किशोर खानविलकर, दुर्वास कदम, बाबूराव कांबळे, चंदा बेलेकर, वैशाली महाडिक, लीला धुमाळ, डॉ. प्रमोद बुलबुले, साताप्पा कांबळे, रामचंद्र वाघमारे, आदींचा समावेश होता.

 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाkolhapurकोल्हापूर