कोल्हापूर : येथील बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिका रुग्णालयात कोविड रुग्णांना उपयोगी पडणारे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आले. युनियनने १३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन खरेदी केल्या असून, कोल्हापूर विभागात काेल्हापूरसह सांगली, सातारा व रत्नागिरी जिल्ह्याला प्रत्येकी एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन देण्यात आली.
सामाजिक कार्यात सदैव उल्लेखनीय योगदान देणाऱ्या बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या वतीने कोविड महामारीत ‘मिशन ऑक्सिजन’ हा उपक्रम संघटनेच्या कार्यक्षेत्रातील जिल्ह्यात राबविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुससार कर्मचारी, अधिकारी यांनी वर्गणी काढून साडेसहा लाख रुपयांचा निधी जमविला. त्यातून प्रत्येकी ५० हजार रुपये किंमत असलेली १३ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनची खरेदी केली आणि ज्या रुग्णालयात विशेषत: गरीब रुग्णांवर मोफत उपचार होतात अशाच रुग्णालयांना त्या भेट म्हणून देण्याचे निश्चित केले होते. त्यातील एक मशीन मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाला देण्यात आली.
या मशीनचा स्वीकार महापालिकेचे उपायुक्त रविकांत आडसूळ, लेखापाल संजय सरनाईक यांनी केला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष उल्हास देसाई, उपाध्यक्ष सुहास शिंदे, विकास देसाई, पांडुरंग वाईंगडे, रमेश मोहिते, विनायक लाड, निखिल कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०१०६२०२१-कोल-बँक ऑफ इंडिया
ओळ - कोल्हापुरातील बँक ऑफ इंडिया स्टाफ युनियनच्या वतीने मंगळवारी कोल्हापूर महानगरपालिकेला ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन भेट देण्यात आली. यावेळी युनियनतर्फे उल्हास देसाई, सुहास शिंदे, विकास देसाई, पांडुरंग वाईंकडे, रमेश मोहिते, विनायक लाड, निखिल कुलकर्णी तर महापालिकेतर्फे रविकांत आडसूळ, संजय सरनाईक उपस्थित होते.