संतोष पाटील- कोल्हापूर -शाहू मिलच्या २६.७५ एकर जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारण्यासाठीचा निश्चित केलेल्या प्राथमिक आराखड्याची सद्य:स्थिती व नव्याने सादरीकरणाबाबत सचिव स्तरावरून महापालिकेला विचारणा करण्यात आली आहे. महापालिकेने १५९ कोटी खर्चाचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) यापूर्वीच शासनाला पाठविला आहे. आता नव्याने स्मारकाबाबत हालचाली गतीमान झाल्या असून नव्या सरकारकडून शाहू स्मारकाची पहिली भेट कोल्हापूरकरांना मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.आघाडी सरकारने दीड वर्षांपूर्वी स्मारकाच्या प्राथमिक आराखडा सादरीकरणावेळी एक कोटी रुपये मंजूर केले होते. त्यानंतर राज्य शासनाने वेळोवेळी शाहू स्मारकांबाबत फक्त घोषणाच केल्या. महापालिकेने १९ आॅगस्ट २०१४ला झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणूक आचारसंहितेपूर्वी स्मारकासाठी मंजूर केलेला निधी वर्ग करण्याचा ठराव केला होता. मात्र, सादरीकरणाशिवाय स्मारकाचे काम पुढे सरकू शकले नाही.स्मारकाचे काम तीन टप्प्यांत होणार आहे. भव्य असा राजर्षी शाहूंचा पुतळा, वाचनालय, राजर्षी शाहूंचा सचित्र जीवनपट दर्शविणारे केंद्र, स्वागत कमान, सांस्कृतिक केंद्र, खुले सभागृह, वस्तुसंग्रहालय, कलाकुसर वस्तू विक्री केंद्र, वस्त्रोद्योग संग्रहालय, खाऊ गल्ली आदींचा या स्मारकाच्या जागेत समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर स्मारकाच्या आराखड्याच्या सादरीकरणाची तयारी सुरू आहे. शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना संबंधित विभागाच्या सचिवांनी याबाबत सूचना दिल्या आहेत. पुढील आठवड्यात सादरीकरण होण्याची शक्यता असून यानंतर राज्य शासनातर्फे स्मारकाच्या पूर्ण निधीची घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रकल्प आराखड्याबाबत काही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्याप्रमाणे प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात येईल. येत्या महिन्याभरात स्मारकाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्याची शक्यता आहे. - नेत्रदीप सरनोबत, शहर अभियंतावाढीव पाच टक्के, वास्तू आरेखक, पीडब्ल्यूडी पडताळणी खर्च, त्रयस्थ समिती सल्लागार, आदींसह संपूर्ण प्रकल्पाचा खर्च १५९ कोटी रुपयांचा असणार आहे.असा आहे १५९ कोटींचा आराखडाटप्पा एक - ५७ कोटी रुपयेप्रवेशद्वार, स्वागतकक्ष, तळमजला एक माहिती केंद्र, पहिला मजला दोन माहिती केंद्र, वस्तुसंग्रहालय आणि कला केंद्र, वस्तू विक्री केंद्र, प्रशासकीय कार्यालय, वस्त्रोद्योग संग्रहालय, चित्रसंग्रहालय, वाचनालय, खाऊ गल्ली, सुरक्षा भिंतदुसरा टप्पा - ४२ कोटी रुपयेराजर्षी शाहू पुतळा व चबुतरा, मध्यवर्ती इमारत, खुले मंच, कोटितीर्थ तलाव सुशोभीकरण, पार्किंग, अॅम्पी थिएटर, कारंजा व कृत्रिम धबधबा, सुरक्षा रक्षक खोल्या.टप्पा तीन - प्रस्तावित खर्च -४९ कोटी रुपयेमध्यवर्ती इमारत (आठ सांस्कृतिक भवन), इमारतीभोवती सुशोभीकरण, सांस्कृतिक भवनाचे प्रवेशद्वार, वीज व सौरऊर्जा यंत्रे जोडणी, नळ व अग्निशमन यंत्रणा जोडणी, वातानुकृूलित यंत्रणा जोडणी, बाग परिसराचे सुशोभीकरण.असा आहे १५९ कोटींचा आराखडाटप्पा एक - ५७ कोटी रुपयेप्रवेशद्वार, स्वागतकक्ष, तळमजला एक माहिती केंद्र, पहिला मजला दोन माहिती केंद्र, वस्तुसंग्रहालय आणि कला केंद्र, वस्तू विक्री केंद्र, प्रशासकीय कार्यालय, वस्त्रोद्योग संग्रहालय, चित्रसंग्रहालय, वाचनालय, खाऊ गल्ली, सुरक्षा भिंतदुसरा टप्पा - ४२ कोटी रुपयेराजर्षी शाहू पुतळा व चबुतरा, मध्यवर्ती इमारत, खुले मंच, कोटितीर्थ तलाव सुशोभीकरण, पार्किंग, अॅम्पी थिएटर, कारंजा व कृत्रिम धबधबा, सुरक्षा रक्षक खोल्या.टप्पा तीन - प्रस्तावित खर्च -४९ कोटी रुपयेमध्यवर्ती इमारत (आठ सांस्कृतिक भवन), इमारतीभोवती सुशोभीकरण, सांस्कृतिक भवनाचे प्रवेशद्वार, वीज व सौरऊर्जा यंत्रे जोडणी, नळ व अग्निशमन यंत्रणा जोडणी, वातानुकृूलित यंत्रणा जोडणी, बाग परिसराचे सुशोभीकरण.
नव्या सरकारकडून शाहू स्मारकाची भेट
By admin | Published: November 04, 2014 12:21 AM