शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
2
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
3
"एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांना माहीत आहे की..."; महायुतीच्या CM पदाच्या चेहऱ्यावरून ओवेसींचं मोठं विधान
4
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
5
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
6
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
7
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
8
उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
9
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
11
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
12
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेशाद्रीने सांगितली आठवण
13
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
14
Maharashtra Election 2024 Live Updates: ‘आम्ही हे करू’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरे म्हणाले...
15
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
16
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
17
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
18
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
20
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!

Kolhapur: ज्या स्कूल बसमधून उतरली त्याच बसखाली सापडून चिमुरडीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 11:44 AM

चुये : येवती (ता. करवीर) येथे स्कूल बसमधून उतरून घरी जाणाऱ्या चिमुरडीचा बसखाली चिरडून हृदयद्रावक मृत्यू झाला. आलीना फिरोज ...

चुये : येवती (ता. करवीर) येथे स्कूल बसमधून उतरून घरी जाणाऱ्या चिमुरडीचा बसखाली चिरडून हृदयद्रावक मृत्यू झाला. आलीना फिरोज मुल्लाणी (वय ५, रा. येवती, ता. करवीर), असे मृत चिमुरडीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडली. याप्रकरणी बसचा चालक नवनाथ मोहन लोंढे (वय ३१) यांच्यावर इस्पुर्ली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.                                   घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, इस्पुर्ली (ता. करवीर) येथील दुधगंगा व्हॅली पब्लिक स्कूलची बस विद्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी सायंकाळी चारच्या दरम्यान येवती येथे येते. गुरुवारी नेहमीप्रमाणे चार वाजता बस गावात आली होती. बस आळवेकर यांच्या किराणा दुकानाजवळ आली असता शाळेची केजीच्या वर्गात शिकणारी विद्यार्थिनी आलीना ही बसमधून उतरली व जवळच असणाऱ्या घराकडे चालत जात होती. चालकाने इतर विद्यार्थी बसमधून उतरल्यानंतर बस थोडी पुढे घेतली. त्यावेळी बसचा धक्का लागल्याने ती धडपडत बसच्या मागील चाकात अडकली. चाक तिच्या डोक्यावरून गेल्याने तिचा जागेवरच मृत्यू झाला. अपघातस्थळाचे दृश्य थरकाप उडवणारे होते.आलीनाच्या पश्चात आई-वडील व एक सात वर्षांचा भाऊ आहे. आलीनाचे वडील फिरोज हे उद्धवसेना युवासेनेचे करवीर तालुकाध्यक्ष आहेत. तसेच ते एका फायनान्स कंपनीत नोकरीस आहेत.

स्वत:च्या शाळेच्या बसनेच चिरडलेआलीना ही दुधगंगा पब्लिक स्कूल इस्पुर्ली येथे सीनियर केजीच्या वर्गात शिकत होती. नेहमीप्रमाणे ती शाळेच्या बसने ये-जा करत होती. दररोजच्या बसमधून प्रवास होत होता तीच बस आलीनासाठी काळ बनून आली. शाळेच्या बसनेच तिचा घात होईल, असे त्यांच्या कुटुंबीयांना व गावकऱ्यांना कधी वाटले नव्हते, अशी चर्चा घटनास्थळी होती.

पोलिसांच्या हस्तक्षेपाने अनर्थ टळलाअपघात घडल्यानंतर घटनास्थळी स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने जमा झाले होते. मृतदेहाची अवस्था पाहून लोकांमध्ये संताप वाढला होता. रागाच्या भरात स्कूल बस फोडण्याच्या तयारीत नागरिक असताना इस्पुर्ली पोलिस ठाण्याच्या सपोनि टी. जे. मगइम या घटनास्थळी हजर झाल्या. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरAccidentअपघातDeathमृत्यू