शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
4
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
5
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
6
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
7
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
8
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
9
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
11
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
12
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
13
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
14
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
15
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
16
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
17
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
18
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
19
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
20
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित

पुरग्रस्तांना प्रतिव्यक्ती प्रतिदिन 60 रुपये देण्याचे चंद्रकांत पाटील यांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2019 12:35 AM

गावात राहिलेल्या पूरग्रस्तांना प्रती दिन प्रती माणसी 60 रुपये, तर लहान मुलांना 45 रुपये गावात जावून दया

कोल्हापूर : गावात राहिलेल्या पूरग्रस्तांना प्रती दिन प्रती माणसी 60 रुपये, तर लहान मुलांना 45 रुपये गावात जावून दया. शिबिरांमध्ये पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या एनजीओना शासकीय दराने प्रतीपूर्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती महसूल तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली. 

      जिल्हा परिषदेमध्ये पालकमंत्री श्री. पाटील यांनी आज आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अमल मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे आदी उपस्थित होते. 

    पालकमंत्री श्री. पाटील यांनी इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, हातकणंगलेचे तहसिलदार सुधाकर भोसले यांना फोन करुन शिरोळ आणि हातकणंगले तालुक्यातील पूरपरिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्याकडूनही दूरध्वनीद्वारे पूरपरिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर पालकमंत्री  पाटील म्हणाले, पूरग्रस्तांसाठी छावणीमध्ये जीवनावश्यक वस्तू पुरविणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना शासन शासकीय दराने पैसे देणार आहे.  उद्यापासून अधिकाऱ्यांनी पूरग्रस्त गावात जाऊन घरांमध्ये असणाऱ्या व्यक्तींना प्रतिदिन प्रती माणसी साठ रुपये तसेच लहाना मुलांना पंचेचाळीस रुपये द्यावेत त्याबाबत योग्य नियोजन करावे. पूरग्रस्तांसाठी पुणे येथून भाजीपाल्याचे ट्रक मागविण्यात येणार आहेत. शहरामध्ये कमी दराने विक्री केंद्रे सुरु करण्यात येणार आहेत.                           शिरोळमध्ये हजारांहून अधिक अन्न पाकिटांचे वितरण : जिल्हाधिकारी  दौलत देसाई

    वायू दलाच्या हेलिकॉप्टरमधून शिरोळ तालुक्यातील टाकळी, बुबनाळ, कुरुंदवाड, बस्तवाड या गावांमध्ये 5 हजारांहून अधिक अन्नाची पाकिटे पूरग्रस्तांसाठी आज पाठविण्यात आली. त्याचबरोबर विशाखापट्टणम येथून नव्याने आलेली 15 जणांचे नौदलाचे पथक शिरोळसाठी पाठविण्यात आले आहे. उद्याही या भागातील गावांमध्ये अन्नाची पाकिटे, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा हेलिकॉप्टरमधून करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. 

    बोटीमधून आज एलपीजीची 87 सिलिंडर शहरामध्ये आणण्यात आली. 20 सिलींडर शिरोळ येथील टाकळीवाडीतील गुरुदत्त कारखान्यावर असणाऱ्या शिबीरामध्ये पाठविण्यात आली. सातारा कागल महामार्गाची आज पाहणी केली. या महामार्गावरील पाणी पातळीमध्ये घट होत असून उद्या दुपारपर्यंत पाणी पातळी कमी झाल्यास प्राधान्याने एलपीजी गॅस टँकर, डिझेल पेट्रोल टँकर शहरामध्ये आणण्यात येणार आहेत. 7 हजार 930 गॅस सिलींडर भरलेले ट्रक तसेच डिझेल व पेट्रोलचे टँकर शिरोलीच्या बाजूला उभे आहेत. शहरातील सर्व पंपावर दोन दिवसांमध्ये पेट्रोल, डिझेल उपलब्ध होईल. हे इंधन दूध, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना प्राधान्याने देण्यात येणार आहे. कागल तालुक्यातील करनूर, वंदूर, सुळकूड या गावातील तीन गर्भवती महिलांना सुरक्षित बाहेर काढून रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. तीन डायलेसीस रुग्णांनाही सुरक्षित बाहेर काढून उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती  देसाई यांनी दिली.

टॅग्स :Kolhapur Floodकोल्हापूर पूरchandrakant patilचंद्रकांत पाटील