मुरगूड : गेल्या अनेक वर्षांपासून हसन मुश्रीफ यांच्याबरोबर प्रवीणसिंह पाटील राजकारणामध्ये सक्रिय आहेत. मुरगूड परिसरातील राष्ट्रवादी भक्कम करावयाची असेल तर गोकुळच्या निवडणुकीत शाहू आघाडीतून प्रवीणसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी. या आघाडीचे प्रमुख म्हणून मुश्रीफ यांनी नावेद मुश्रीफ यांच्यासह कागल तालुक्याला आणखी दोन जागा घ्याव्यात व त्यातून पाटील यांची उमेदवारी निश्चित करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली.
प्रवीणसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी या प्रमुख मागणीसाठी मुरगूड येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक पार पाडली. अध्यक्षस्थानी करंजीवणेचे माजी सरपंच अर्जुन मसवेकर होते. स्वागत प्रास्ताविक सुधीर सावर्डेकर यांनी केले, तर आभार गुरुदेव सूर्यवंशी यांनी मानले.
यावेळी मुरगूड बँकेचे उपाध्यक्ष वसंतराव शिंदे म्हणाले, कागलच्या पश्चिम भागात प्रवीणसिंह पाटील यांनी प्रामाणिकपणे मुश्रीफ यांच्यासाठी काम केले आहे. गेल्या चार वर्षांपासून गोकुळमध्ये उमेदवारीचा हट्ट करत आलो आहे. शिवाय आमचे नेते मुश्रीफ यांनी ग्रीन सिग्नल दिल्याने जिल्ह्याचा दौरा पूर्ण केला आहे. नावेद मुश्रीफ व वीरेंद्र मंडलिक यांच्यासह तिसरी जागा घेऊन त्या ठिकाणी पाटील यांची उमेदवारी मुश्रीफ यांनी जाहीर करावी, अशी विनंती त्यांनी केली.
गोकुळचे निवृत्त अधिकारी रणजित सासणे यांनी गोकुळ बचाव कृती समितीच्या माध्यमातून सर्वसाधारण सभेच्या वेळी प्रवीण पाटील यांनी आवाज उठविला आहे.
यावेळी राहुल वंडकर, शिवाजी सातवेकर, अशोक पाटील, नामदेव भांदीगरे, रणजित मगदूम, प्रल्हाद कांबळे, संजय गांधी निराधार समितीचे सदस्य राजू आमते, संजय मोरबाळे, सुधीर मोहिते, पांडुरंग चांदेकर, जगन्नाथ पुजारी, रणजित मगदूम, अमर देवळे, एकनाथ पाटील, रमेश पाटील, दिग्विजय चव्हाण आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रवीणसिंह पाटील यांचा फोटो वापरावा