ठळक मुद्देगडहिंग्लज शहरातील वंचिताना शिधापत्रिकेवरील धान्य द्याराष्ट्रवादीची मागणी : ६०० शिधापत्रिकाधारक रेशनपासून वंचित
गडहिंग्लज : अन्नसुरक्षा कायद्यान्वये मिळणाऱ्या धान्यपासून वंचित असणाऱ्या शहरातील शिधापत्रिकाधारकांना रेशनवरील धान्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीतर्फे निवेदनाद्वारे तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे, गडहिंग्लज शहरासह बेघर वसाहतीमधील सुमारे ६०० शिधापत्रिकाधारक अन्नसुरक्षा धान्यापासून वंचित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मोलमजुरी, धुणीभांडी, विधवा, परितकत्यांचा समावेश आहे. त्यांना रेशनवरील धान्य देण्यात यावे.
शिष्टमंडळात उदय जोशी, हारूण सय्यद, सिद्धार्थ बन्ने, गुंड्या पाटील, महेश सलवादे, सुनिता नाईक, शबाना मकानदार, रेश्मा कांबळे, शुभदा पाटील, सावित्री पाटील, शर्मिली पोतदार, रूपाली परिट, दीपक कुराडे, मंजूषा कदम, शारदा आजरी आदींचा समावेश होता.