शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
3
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
4
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
5
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
6
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
7
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
8
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
9
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
10
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
11
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
12
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
13
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
14
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
15
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
16
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
17
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
18
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
19
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
20
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप

Lok Sabha Election 2019 : लाखावरील व्यवहाराची माहिती निवडणूक खर्च कक्षाला द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 1:34 PM

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बॅँकांनी त्यांच्याकडील खात्यामध्ये एक लाख रुपयावरील अनियमित, संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधकांमार्फत जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षास दररोज देणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी बॅँक प्रतिनिधींना केले.

ठळक मुद्देलाखावरील व्यवहाराची माहिती निवडणूक खर्च कक्षाला द्याजिल्हाधिकाऱ्यांचे बँक प्रतिनिधींना निर्देश : संशयास्पद व्यवहारांवर लक्ष

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील बॅँकांनी त्यांच्याकडील खात्यामध्ये एक लाख रुपयावरील अनियमित, संशयास्पद बँक व्यवहारांची माहिती जिल्हा अग्रणी प्रबंधकांमार्फत जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षास दररोज देणे बंधनकारक आहे. त्याची अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी मंगळवारी बॅँक प्रतिनिधींना केले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय बँकर्स सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी जि. प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हास्तरीय खर्च कक्षाचे नोडल अधिकारी संजय राजमाने, प्रकल्प संचालक अजय माने, रिझर्व्ह बँकेचे साहाय्यक महाप्रबंधक प्रवीण सिंदकर, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक नंदू नाईक, जिल्हा अग्रणी प्रबंधक राहुल माने, ‘माविम’चे वरिष्ठ जिल्हा समन्वयक बाळासाहेब झिंजाडे, आदी प्रमुख उपस्थित होते.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष व उमेदवारांच्या बँकिंग व्यवहाराबाबत मार्गदर्शक सूचना आणि निर्बंध लागू केले आहेत. याबाबतची सविस्तर माहिती आयोगाच्या वेबसाईटवरून उपलब्ध करून घेऊन, सर्व बँकर्सनी याबाबत दक्षता घेऊन कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.जिल्हाधिकारी देसाई म्हणाले, बँकांनी निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याकडील बँक खात्यामध्ये एक लाख रुपयावरील अनियमित, संशयास्पद बँक व्यवहार झाल्यास त्याची माहिती त्याच दिवशी जिल्हा अग्रणी प्रबंधकांमार्फत जिल्हास्तरीय निवडणूक खर्च कक्षास कळवावी. उमेदवारांचे निवडणुकीच्या अनुषंगाने स्वतंत्र बँक खाते उघडणे गरजेचे असून, याकामी सर्व बँकांनी सहकार्य करावे.

या बँक खात्यासाठीचे आवश्यक असणारे चेकबुक तत्काळ उपलब्ध करून द्यावे, तसेच उमेदवार १० हजार रुपयांपर्यंतचे रोख व्यवहार करू शकतात, उर्वरित रकमेचे व्यवहार ‘आरटीजीएस’ व ‘एनईएफटी’ करणे बंधनकारक आहे. याचीही माहिती घेऊन याबाबत उपाययोजना प्राधान्याने करावी. निवडणुकीच्या काळात या कामासाठी सर्व बँकांनी स्वतंत्र अधिकाऱ्यांकडे हे काम सोपवावे.

 

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकkolhapurकोल्हापूरcollectorजिल्हाधिकारीBanking Sectorबँकिंग क्षेत्र