लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये सचोटीने कारभार करत असताना शेणामुतात हात घालून अहोरात्र राबणाऱ्या माता-भगिनींच्या कष्टाला न्याय द्या, असे आवाहन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
‘गोकुळ’च्या अध्यक्षपदी शुक्रवारी विश्वास पाटील यांची निवड झाली. त्यानंतर त्यांनी कागल येथे जाऊन डी.आर. माने महाविद्यालय परिसर येथे मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ऋतज्ञता व्यक्त केली. यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी चांगला कारभार करा आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची सूचना केली. अंजिक्यतारा येथील कार्यालयात जाऊन अध्यक्ष पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन ऋतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील उपस्थित होते. खासदार संजय मंडलिक यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या घरी जाऊन भेट घेऊन आभार व्यक्त केले.
फोटो ओळी :
१) ‘गोकुळ’चे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील यांनी शुक्रवारी दुपारी कागल येथे जाऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ऋतज्ञता व्यक्त केली. यावेळी सुनील पाटील, अनिल सोलापुरे आदी उपस्थित होते. (फाेटो-१४०५२०२१-कोल-हसन मुश्रीफ)
२) अध्यक्ष विश्वास पाटील यांनी निवडीनंतर कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात जाऊन पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन ऋतज्ञता व्यक्त केली. यावेळी डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती संजय डी. पाटील उपस्थित होते. (फोटो-१४०५२०२१-कोल- सतेज पाटील)