शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

स्थानिक खेळाडूंना संधी देणार

By admin | Published: March 04, 2016 9:36 PM

नीलेश राणे : मालवणातील ज्येष्ठ क्रिकेटपटंचा सत्कार

मालवण : उद्योजक बाबा परब व चिवला बीच मित्रमंडळाच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचा उपक्रम कौतुकास्पद आहे. स्पर्धेमुळे ग्रामीण खेळाडूंना संधी मिळाली. आपल्यालाही क्रिकेटची आवड असून खासदार असताना अनेक खेळाडूंना संधी दिली. स्थानिकांना संधी देणारे आता आमदार, खासदार आहेत की नाही हेच कळत नाही. त्यामुळे आता ही जबाबदारी आपल्यावरच आली आहे. बाबा परब आणि मित्रमंडळाने क्रिकेटपुरते मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रम हाती घेऊन लोकांचा विकास साध्य करावा, असे प्रतिपादन माजी खासदार नीलेश राणे यांनी केले.मालवण येथे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बाबा परब आणि चिवला बीच मित्रमंडळाच्यावतीने टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग मैदानावर ३ ते ६ मार्च या कालावधीत राज्यस्तरीय टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते मालवणातील ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष मंदार केणी, शहर अध्यक्ष लीलाधर पराडकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, सभापती हिमाली अमरे, खरेदी संघाचे अध्यक्ष आबा हडकर, नगरसेविका ममता वराडकर, महानंदा खानोलकर, दीपक पाटकर, उदय परब, आनंद शिरवलकर, दामू तोडणकर, राजू बिडये, यतीन खोत, अभय कदम, अमु हर्डीकर आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी कोकणाने अनेक खेळाडू राज्यासह देशाला दिले आहेत. यापुढेही या भूमीतून असेच खेळाडू निर्माण होतील, असे संग्राम प्रभुगावकर यांनी सांगितले. तर अशोक तोडणकर, सुदेश आचरेकर, मंदार केणी, हिमाली अमरे यांनी बाबा परब मित्रमंडळाचे कौतुक करताना मालवणच्या या मातीतून अनेक खेळाडू घडले. यापुढेही दर्जदार खेळाडू घडावेत, अशा शुभेच्छा दिल्या. (प्रतिनिधी)ज्येष्ठ क्रिकेटपटूंचा सन्मान बाबा परब मित्रमंडळाच्यावतीने मालवणातील ज्येष्ठ क्रिकेटपटंूचा सन्मान करण्यात आला. यात भाऊ हडकर, लीलाधर हडकर, विनायक मेतर, रमेश गिरकर, विजय तारी, दीपक मयेकर, सतीश गावकर, भाई खराडे, नरी चिंदरकर, दिलीप मांजरेकर, बाळा पडेलकर, जगदीश नेवाळकर, सिराज मुकादम, सत्यविजय चिंदरकर, दिलीप मालवणकर, उत्तम नेमळेकर, बबन रेडकर, उमेश मांजरेकर, आम्रोज आल्मेडा, मंगेश धुरी, नंदू देसाई, पप्पू परब, दीपक धुरी यांचा सत्कार राणे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच युवा क्रिकेटपटू राहुल परुळेकर याचाही विशेष गौरव करण्यात आला.