जयसिंगपूर : शहरात कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे यावर प्रतिबंध म्हणून लस घेणे हाच उपाय आहे. मात्र, लोकसंख्येच्या तुलनेत शहरासाठी ज्यादा कोविड लस उपलब्ध करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन नागरिकांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले.
निवेदनात असे म्हटले आहे, गेल्या तीन महिन्यांपासून लसीकरण सुरू आहे. जयसिंगपूर शहराची लोकसंख्या ६० ते ७० हजारांच्या आसपास आहे. शहराबरोबर परिसरातील गावातील नागरिकही याठिकाणी असणा-या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस घेण्यासाठी येत असतात. मात्र, आरोग्य केंद्रात लसच उपलब्ध नसल्याने अनेकांची निराशा होत आहे. त्यामुळे लसीचा ज्यादा पुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर सागर मादनाईक, शैलेश आडके, बजरंग खामकर, संजय मादनाईक, प्रेमजित पाटील, अमित मगदूम, प्रशांत मादनाईक यांच्या स्वाक्ष-या आहेत.
-------------------
आधार किटची गरज
जयसिंगपूर शहरातील नागरिकांना आधारकार्डमधील दुरुस्ती, तसेच नवीन आधारकार्ड काढण्यासाठी अर्जुनवाड, शिरोळ, निमशिरगाव याठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा खर्च होत आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेवून शहरात आधारकिट लावण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
फोटो - ०६०७२०२१-जेएवाय-०२
फोटो ओळ - जयसिंगपूर नागरिकांच्यावतीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांना निवेदन देण्यात आले.