शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदासाठी अनुभवी प्राचार्यांना संधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2020 10:25 AM

shivajiunviersity, vicechanslaor, educationsector, kolhapurnews शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावर अधिविभागांतील प्राध्यापकांऐवजी संलग्नित महाविद्यालयांमधील अनुभवी आणि विद्यापीठ कायद्याची माहिती असणाऱ्या प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका विद्यापीठ प्राचार्य संघटनेने घेतली आहे.

ठळक मुद्देविद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदासाठी अनुभवी प्राचार्यांना संधी द्याप्राचार्य संघटना आग्रही : कणसे, चौगुलेसह पाचजणांचे बायोडाटा कुलगुरूंकडे सादर

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूपदावर अधिविभागांतील प्राध्यापकांऐवजी संलग्नित महाविद्यालयांमधील अनुभवी आणि विद्यापीठ कायद्याची माहिती असणाऱ्या प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आग्रही भूमिका विद्यापीठ प्राचार्य संघटनेने घेतली आहे.

या पदासाठी इच्छुक असणाऱ्या प्राचार्य डॉ. डी. जी. कणसे (डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय सांगली), प्रवीण चौगुले (डी. आर. माने कॉलेज कागल), व्ही. एम. पाटील (न्यू कॉलेज, कोल्हापूर), आर. आर. कुंभार (दत्ताजीराव कदम आर्टस, कॉमर्स कॉलेज इचलकरंजी), मंगलकुमार पाटील (घाळी कॉलेज, गडहिंग्लज) यांचे बायोडाटा (परिचयपत्र) संघटनेने कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याकडे सादर केले आहेत.

माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत प्र-कुलगुरू डॉ. शिर्के यांचा कार्यकाळ दि. १८ जूनला संपला. त्यानंतर हे पद रिक्त आहे. कुलगुरूपदी डॉ. शिर्के यांच्या निवड झाली आहे. त्यामुळे आता प्र-कुलगुरू निवडीच्या हालचाली गेल्या १५ दिवसांपासून गतीमान झाल्या आहेत. पूर्वी बीसीयुडी संचालक हे पद होते. नवीन विद्यापीठ कायद्यानुसार हे पद आता नाही.

या पदाची सर्व कार्यभार प्र-कुलगुरूंकडे देण्यात आला आहे. महाविद्यालयांशी संबंधित संलग्नतेच्या कामांची जबाबदारी या पदावर आहे. त्यामुळे या पदावर अनुभवी प्राचार्यांना संधी द्यावी, अशी आमची आग्रही भूमिका आणि मागणी असल्याचे विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.समन्वय राहीलविद्यापीठ कॅम्पसवरील डॉ. शिर्के यांची कुलगुरूपदी निवड झाली आहे. प्र-कुलगुरूपदांवर प्राचार्यांना संधी दिल्यास विद्यापीठाच्या कामकाजामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने समन्वय राहण्यास मदत होईल. मुंबई, सोलापूर, औरंगाबाद, आदी विद्यापीठांमध्ये प्र-कुलगुरूपदावर प्राचार्यांना संधी दिली आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठाबाबत याप्रमाणे विचार व्हावा, अशी मागणी प्राचार्य संघटनेची असल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Shivaji Universityशिवाजी विद्यापीठkolhapurकोल्हापूर