कोल्हापूर - सर्वांना रेशनचा अधिकार द्या, रेशनकार्डाची संख्या कमी करू नये आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी लाल बावटा बांधकाम संघटनेतर्फे करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदार शीतल मुळे यांना निवेदन देवून मोर्चाची सांगता करण्यात आली. यावेळी ‘मी धान्याचा अधिकार सोडणार नाही’ असे लाभार्थीकडून भरून घेण्यात आलेले दोन हजार अर्ज तहसीलदारांकडे देण्यात आले.
रेशन बचाव समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत यादव यांच्या नेतृत्वाखाली दसरा चौकातून दुपारी बारा वाजता दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात मागण्यांच्या घोषणा देण्यात आल्या. मोर्चा सीपीआरमार्गे करवीर तहसीलदार कार्यालयावर आला. तेथे शिष्टमंडळाव्दारे तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. संघटनेचे करवीर तालुका अध्यक्ष आनंदा कराडे, शिवाजी मगदूम, आर. के. पेन्टर आदी पदाधिकारी मोर्चात सहभागी झाले होते