शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
2
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
3
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
4
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
5
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
6
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
7
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
8
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
9
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
10
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
11
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
12
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
13
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
14
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
15
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
16
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?
17
योगींसह 'या' नेत्यांच्या सुरक्षेतून NSG चे ब्लॅक कॅट कमांडो हटवणार, सरकारने आखली नवीन योजना
18
भारत जगाचे नेतृत्व करणार; 6G बाबत सरकारची मोठी घोषणा, Jio-Airtel-BSNL-Vi ग्राहकांना...
19
रशिया-युक्रेन युद्धाचा भारताला मोठा फटका! ३ अब्ज डॉलर्सच्या करारवर सही झाली, पण...
20
"उद्धव ठाकरे आजारी पडल्याचं टायमिंग साधून निवडणुकीची घोषणा, त्यामागे षडयंत्र तर नाही ना?’’ ठाकरे गटाला शंका

सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे शिष्यवृत्ती द्या, कोल्हापुरात विद्यार्थ्यांचे आंदोलन

By पोपट केशव पवार | Published: September 09, 2023 3:45 PM

मागणी मान्य केल्याबद्दल मंत्री पाटील यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र, निर्णय रद्द करून सरकारने मराठा समाजाला फसविल्याचा आरोप

कोल्हापूर : सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती द्या, अशी मागणी करत संशोधक विद्यार्थ्यांनी शनिवारी दसरा चौकात आंदोलन केले. संभाजी ब्रिगेडच्या नेतृत्वाखाली केलेल्या या आंदोलनावेळी विद्यार्थ्यांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या. सारथीच्या संशोधक विद्यार्थ्यांना बार्टीप्रमाणे नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती देण्याची मागणी १८ एप्रिलच्या मराठा आरक्षण उपसमिती बैठकीत मंत्री चंद्रकात पाटील यांनी मान्य केली होती. मागणी मान्य केल्याबद्दल मंत्री पाटील यांचा सत्कारही करण्यात आला. मात्र, ४ मे रोजी हा निर्णय रद्द करून सरकारने मराठा समाजाला फसविल्याचा आरोप संशोधक विद्यार्थ्यांनी केला. नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती मिळत नसल्याने दीड-दोन वर्षे संशोधन कार्यात अडथळा निर्माण होऊन मराठा समाजातील विद्यार्थी मुख्य प्रवाहातून बाजूला पडत आहेत. बार्टी संस्था संशोधक विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांकापासून शिष्यवृत्ती देते, मग सारथी का देत नाही ?, मराठा समाजाला वेगळा न्याय कशासाठी ? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला. याआधी सारथी संस्था ६०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत होती. मात्र, १ जूनला बार्टी, सारथी, महाज्योती या संस्थांच्या योजनांमध्ये सर्वंकष धोरण निश्चित करण्यासाठी आयोजित बैठकीत छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती बॅचला केवळ ५० जागाच ठेवल्या आहेत. यामुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला आहे. यावेळी संभाजी खोत, क्रांतिसिंह देसाई, संयोगिता पाटील, सौरभ पवार, धनश्री मोरे, निकिता शिंदे, मृणाल उलपे, सुहासिनी यादव, ज्योती थोरात, गौरी खोत उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरScholarshipशिष्यवृत्तीmarathaमराठाStudentविद्यार्थी