काेल्हापूर शहर व जिल्हा आणि मुंबई महानगर परिक्षेत्रात रिक्षा व्यवसायात तफावत आहे. सध्या दुचाकी वाहनांची संख्या सतत वाढत आहे. त्यामुळे रिक्षा प्रवाशी संख्या दिवसेंदिवस घटत आहे. त्यामुळे तूर्तास भाडेवाढ केल्यास रिक्षात प्रवाशी बसणार नाहीत. शहरात शेअर-ए-रिक्षा पद्धतीने व्यवसाय सुरू असून मीटरप्रमाणे रिक्षा व्यवसाय फक्त २० टक्के सुरू आहे. रिक्षा भाडेवाढ झाल्यास मीटर कॅलिब्रेशन (फेरबदल) करण्यास किमान एक हजार रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे भाडेवाढ देण्याचे झाल्यास सर्वच संघटनांच्या प्रमुखांना बैठकीस बोलावून निर्णय घ्यावा. मीटर फेरफार न करता टेरिफ कार्डप्रमाणे व्यवसायास परवानगी द्यावी. हे न झाल्यास रिक्षा व्यावसायिकांना रोज तीन लिटर पेट्रोल रेशनवर स्वस्त दरात उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी संघटनेतर्फे केली. यावेळी अध्यक्ष सुभाष शेटे, ईश्वर चन्नी, शिवाजी पाटील, अरुण घोरपडे, बाळासाहेब सदलगे, राजू थोरवडे, विश्वास नांगरे, मधू सावंत, शरफुद्दीन शेख, महादेव विभूते आदी उपस्थित होते.
रिक्षा व्यावसायिकांसाठी रेशनवर तीन लिटर पेट्रोल द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 4:30 AM